Voting ID Cards: अरे बापरे! कल्याणमध्ये रस्त्यावर आढळले गोणी भरून मतदार ओळखपत्र, परिसरात मोठी खळबळ VIDEO

Voter ID Cards Found In Kalyan: कल्याणमध्ये गोणीभरून मतदार ओळखपत्र सापडले आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कल्याणमध्ये गोणीभरून मतदार ओळखपत्र सापडले
Kalyan NewsSaam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण

कल्याणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण-शीळ रोडवरील पिसवली गावाच्या कमानीसमोर काल (१९ जून) रात्रीच्या सुमारास गोणी भरून मतदार ओळखपत्र सापडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामधील बहुतेक ओळखपत्र कल्याण पूर्व नेतीवली, सूचक नाका परिसरातील असल्याचे निदर्शनास आलं होतं. मनपाडा पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीमधील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याच दिसून आलं होतं. अनेक मतदारांची नावं नव्हती. अनेक मतदारांना मतदार ओळखपत्र मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्र ताब्यात घेतली (Voter ID Cards Found In Kalyan) आहेत. मतदान ओळखपत्र येथे कोणी टाकली, येथे कुठून आली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतदानाच्या दिवशी कल्याण डोंबिवली परिसरात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं दिसून आलं होतं. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती, तर अनेक मतदारांना मतदार ओळखपत्र मिळालं नव्हतं. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवस उलटत नाही, तोच काल रात्रीच्या सुमारास कल्याण शीळ रोडवरील पिसवली गावाच्या कमानी समोरील रस्त्यावर गोणी भरून मतदार ओळखपत्र आढळून आलेत.

कल्याणमध्ये गोणीभरून मतदार ओळखपत्र सापडले
Lok Sabha Speaker Post: मंत्रिपदापेक्षा लोकसभेच्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच! भाजप तडजोड करायला तयार नाही? काय आहे कारण?

ही मतदार ओळखपत्र काही नागरिकांच्या निदर्शनास आली. यामधील बहुतेक ओळखपत्र हे कल्याण पूर्वेकडील नेतिवली, सूचक भागातील आहेत. त्यानंतर या भागात गर्दी जमा झाली (Voter ID Card) होती. नागरिकांनी ही मतदार ओळखपत्र जमा करून या घटनेबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही मतदार ओळख पत्र ताब्यात घेतले आहेत. निवडणुकीच्या निकालाच्या निकालानंतर काही दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मतदार ओळखपत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली ( Kalyan News) आहे.

कल्याणमध्ये गोणीभरून मतदार ओळखपत्र सापडले
Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जून रोजी होणार निवडणूक, 3 जुलैपर्यंत चालणार संसदेचे अधिवेशन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com