Kalyan News : कल्याण शीळ रोडवर वाहतूक कोंडी; विद्यार्थी अडकले, दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्याची वेळ

Kalyan News : कल्याण शिळ रोडवर मेट्रो १२ चे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे निम्मा रस्ता व्यापला गेल्याने कल्याण शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण शीळ रोडवर मेट्रोच्या कामामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या शाळांच्या बसेस देखील अडकल्याने शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. कल्याण शीळ रोडवर मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. 

Kalyan News
Amravati Airport : सप्टेंबरच्या अखेरीस अमरावती विमानतळावरून उड्डाण; खासदार बळवंत वानखडे यांनी केली विमानतळाची पाहणी

कल्याण (Kalyan) शिळ रोडवर मेट्रो १२ चे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे निम्मा रस्ता व्यापला गेल्याने कल्याण शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक बेजार झाले आहेत. त्यातच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शाळेच्या बस अडकत असल्याने विद्यार्थी, रुग्णाचे देखील हाल होत आहेत. आज सकाळी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतुक कोंडीत मोठ्या प्रमाणात शाळेच्या बस अडकल्या. 

Kalyan News
Gondia News : गोंदियात होर्डींग काढताना भयंकर घटना; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

मानपाडा परिसरात असलेली विद्यानिकेतन शाळेच्या बसेस देखील या (Traffic Jam) वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. दुपारी साडेअकरा वाजून गेले तरी बस शाळेत पोहचू न शकल्याने अखेर शाळा प्रशासनाने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. याबाबत विद्यानिकेतनचे संचालक विवेक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली. मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र वाहतूक पोलिसांचा नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचबरोबर नागरिक गाड्या चालवतायत ते वाहतूक कोंडीत भर घालतात. वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत वाहतूक पोलीसांचे शून्य नियोजन असल्याचा आरोप केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com