शुभम देशमुख
गोंदिया : शहरातील विद्युत खांबांवर अनधिकृत जाहिरातींचे होर्डिंग लावले गेले असून. हे होर्डिंग काढत असताना एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना गोंदिया शहरात घडली आहे. होर्डिंग काढत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.
गोंदिया (Gondia) शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिर चौपाटी परिसरात सदरची घटना घडली असून यात छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, व्यापारी वर्ग, राजकारणी यांचे होर्डिंग नगरपरिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जातात. यासंदर्भात नगरपरिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत मुख्याधिकाऱ्यांसमोर सामाजिक संघटनांनी आवाज उठवला.
अनधिकृतपणे होर्डिंग लावल्याबाबत नगरपालिका कोणतीही कार्यवाही करत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात दुर्दैवी घटना घडली असून ज्यामध्ये छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. आकाश हा (Electric Shock) विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना त्याला विद्युत करंट लागून फेकला गेला. यानंतर त्याला केटीएस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.