Jawhar News
Jawhar NewsSaam tv

Jawhar News : नगरपालिकेच्या आवारात खैर जातीच्या लाकडांचा ढीग; जव्हार वन विभागाकडून गुन्हा दाखल

Jawhar News : सागवान लाकूड, खैर लाकूड तसेच जंगल परिसरातून लाकडांची तोड करण्यास मनाई आहे
Published on

फय्याज शेख 

जव्हार : जव्हार वन विभागाकडून जव्हार नगरपरिषद व जुन्या राजवाड्याच्या परिसरातून लाखांचा खैर जातीचे लाकडे जप्त करण्यात आले आहे. याबाबत वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास जव्हार वन विभागाकडून करण्यात येत आहे.

Jawhar News
Mumbai Pune Highway : लोणावळा शहरातून अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी; पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश

सागवान लाकूड, खैर लाकूड तसेच जंगल परिसरातून लाकडांची तोड करण्यास मनाई आहे. मात्र जव्हार शहरातील जुना राजवाडा व नगरपरिषद यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात खैर जातीच्या लाकडाचा ढिग नागरिकांना आढळून आला. याबाबत जव्हार (Forest department) वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यांची माहिती देण्यात आली. यानंतर माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. 

Jawhar News
Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

लाकूड आले कुठून शोध सुरु 

जुना राजवाडा व नगरपरिषदेच्या आवारात या महागड्या खैर जातीच्या लाकडांचा ढिग आला कुठून? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा तपास वन विभागाकडून केला जात असून (Crime) गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com