VIDEO: 'लोकसभा निकालात मोठी डील, निवडणूकीत आदर्श घोटाळा', संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut on Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा वाद थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच रवींद्र वायकर यांच्या विजयासाठी मोठी डील झाल्याचा आरोप करत संजय राऊतांनी मोठी खळबळ उडवून दिलीय.
'लोकसभा निकालात मोठी डील, निवडणूकीत आदर्श घोटाळा', संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Sanjay Raut on Ravindra WaikarSaam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईतील उत्तर पश्चिमच्या लोकसभा निकालाच्या वादात संजय राऊतांच्या एन्ट्रीनं वेगळंच वळण मिळालंय. संजय राऊतांनी उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभा निकालानंतर वनराई पोलिस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला. यासाठी मोठी डील झाल्याचा आरोप करून संजय राऊतांनी मोठी खळबळ उडवून दिलीय. एवढंच नाही तर याच संशयावरून संजय राऊतांनी रवींद्र वायकर यांना खासदारपदाची शपथ न देण्याची मागणी केलीय.

रवींद्र वायकर यांच्या अवघ्या 48 मतांच्या विजयानंतर मुंबई उत्तर पश्चिमचा वाद चांगलाच पेटलाय. त्यातच अमोल किर्तीकर यांनी मतमोजणीच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते. मात्र मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आणि हा वाद आणखी पेटला. त्यातच रवींद्र वायकर यांचे मेव्हणे मंगेश पंडीलकरांनी मतमोजणी केंद्रात फोन नेल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ठाकरे गटाने थेट ईव्हिएम हॅक झाल्याचा आरोप केला. हे आरोप नेमके काय आहेत? जाणून घेऊ

'लोकसभा निकालात मोठी डील, निवडणूकीत आदर्श घोटाळा', संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
VIDEO: पराभवानंतर भाजपचा अॅक्शन प्लॅन, अडचणीतील 33 मतदारसंघांसाठी आखली नवीन रणनीती

4 जूनला मतमोजणीदरम्यान नेस्को सेंटरमधील डेटा ऑपरेटर दिनेश गुरवने रवींद्र वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकरला आपला मोबाईल वापरायला दिला. याच मोबाईलवर ईव्हिएम अनलॉक करण्याचा ओटीपी आल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र ठाकरे गटाने केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेत.

'लोकसभा निकालात मोठी डील, निवडणूकीत आदर्श घोटाळा', संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय, पाहा व्हिडिओ

उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालाविरोधात ठाकरे गट कोर्टात जाणार आहे. त्यातच वनराई पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनांमुळे संशयाचं मुळ अधिक बळकट होतंय. त्यामुळे पोलिस तपासात नेमकं काय समोर येणार? संजय राऊतांचे आरोप खरे की खोटे? याबरोबरच वायकरांची खासदारकी राहणार की जाणार? हे कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com