Ravindra Waikar News: रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या अडचणी वाढणार?

Ravindra Waikar Win Was Managed: लोकसभेच्या निवडणुकीत रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी निवडून आले. निकालात मोठी हेराफेरी झाली असून मतमोजणीदरम्यान गैरप्रकार झाला असा आरोप ठाकरे गटाने केला होता.

Political News: लोकसभेच्या निवडणुकीत रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी निवडून आले. निकालात मोठी हेराफेरी झाली असून मतमोजणीदरम्यान गैरप्रकार झाला असा आरोप ठाकरे गटाने केला होता. उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार भरत शहा यांनी मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मोबाईलचा वापर करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन रविंद्र वायकरांचा मेव्हणा मंगेश पंडीलकर हा होता. पंडीलकर कडून चक्क ईव्हीएमशी जोडलेल्या मोबाईलफोनचा वापर करणात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडून आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव याच्यावर पंडलीकरला फोन दिल्याचा आरोप असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पंडीलकरचा मोबाईल जप्त करण्यात आला, त्यावरील बोटांचे ठसे घेण्यात आले. पंडलीकर फोनवरुन कोणाशी बोलत होता याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com