PM Kisan Sanman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेअंतर्गत आता ८००० रुपये मिळणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू

PM Kisan Sanman Nidhi Scheme: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांनी घेतला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ८००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan Sanman NidhiSaam Tv
Published On

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन २३ जुलै रोजी मोदी सरकारचं पहिलं अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाते निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी, कर्मचारी वर्ग आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याची शक्यता आहे.यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

PM Kisan Sanman Nidhi
Petrol Diesel Rate Today: देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या योजनेची रक्कम ६००० रुपयांवरुन ८००० रुपये करावी, अशी मागणी होत आहे. सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. यात हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जाते.

एप्रिल महिन्यात झालेल्या चर्चेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शेतकऱ्यांच्या व्यापती वाढवण्यावर वाढ दिला आहे. सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेवर विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. या योजनेत मिळणारी रक्कम वाढवावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे सरकार ही रक्कम ६००० रुपयांवरुन ८००० रुपये करण्याच्या विचारात आहे, असं सांगण्यात येत आहे.

PM Kisan Sanman Nidhi
EPFO Interest Rate: अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारचं गिफ्ट; EPFO च्या व्याजदरात भरघोस वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी केला होता होता. १७ व्या टप्प्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये रक्कम जमा करण्याच आली होती.

PM Kisan Sanman Nidhi
Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 एकाचवेळी लॉन्च; AI फीचर्स असलेल्या फोनची जाणून घ्या किंमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com