Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 एकाचवेळी लॉन्च; AI फीचर्स असलेल्या फोनची जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy : दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 लॉन्च केलाय. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आर्टिफीशियल इंटेलिजन्सचे फीचर्स देण्यात आलेत.
Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 एकाचवेळी लॉन्च; AI फीचर्स असलेल्या फोनची जाणून घ्या किंमत
Samsung Galaxy
Published On

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने आपल्या Galaxy Unpacked 2024 इव्हेंटमध्ये लेटेस्ट फोल्डेबल डिव्हाइस Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 ला लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन (Qualcomm Snapdragon) 8 Gen 3 प्रोसेसर आहे. हे प्रोसेसर AI च्या नवीन फीचर्सला मदत करतील. कार्यक्षमतेच्या बाबतीत हे दोन्ही फोन चांगले आहेत.

Galaxy Z Fold 6

या मोठ्या स्क्रीनच्या फोल्डेबल फोनमध्ये 7.6-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आहे. जे 2600nits ची कमाल ब्राइटनेस देते. तर गोरिला ग्लास देण्यात आलाय. या फोनमध्ये 1.6 पटीने मोठा असलेल्या वेपर चेंबर आहे, याचा उपयोग गेमिंग किंवा जास्त वेळ वापरला तरी फोन गरम होऊ न देण्यासाठी होतो.

याशिवाय Galaxy AI आधारित फीचर्स फोनमध्ये उपलब्ध असतील. या डिवाइसला S-Pen चा सपोर्ट देण्यात आलाय. एक 6.3-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देखील देण्यात आलाय. या फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आलेतय. 50MP OIS प्रायमरी, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 10MP टेलीफोटो सेन्सर 3x ऑप्टिकल झूमसह कॅमेरे या फोनमध्ये मिळतील. या फोनच्या कव्हर डिस्प्लेवर 10MP वाला सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. या फोनमध्ये जलद चार्जिंग सपोर्टसह 4400mAh बॅटरी मिळेल.

Galaxy Z Flip 6

क्लॅमशेल स्टाइल असलेल्या सॅमसंगचा फोनमध्ये 3.4 इंचाचे AMOLED FlexWindow सेंकडरी डिस्प्ले देण्यात आलाय. या डिव्हाइसमध्ये सुद्धा एआय फीचर्स देण्यात आलेत. यात 6.7 इंच डायनॅमिक AMOLED ला 2X रिफ्रेश रेट देण्यात आला असून या फोनची जाडी 6.9mm आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आलाय. तसेच Android 14 अधारित सॉफ्टवेअर यात देण्यात आले आहे.

डिव्हाइसच्या मागील पॅनलवर 50MP OIS प्रायमरी आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 10MP सेल्फी कॅमेरा असलेल्या या डिव्हाइसला 4000mAh बॅटरी 25W चार्जिंग सपोर्टसह प्रदान केली गेली आहे.

Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 ची किमत

भारतीय बाजारात Samsung Galaxy Z Fold 6 ची किमत त्याची किंमत 164,999 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रीमियम डिव्हाइस 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजसह येतो. Samsung Galaxy Z Flip 6 ची सुरुवातीची किंमत 109,999 रुपये ठेवण्यात आलीय. हा फोन 256GB आणि 512GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या नवीन फोन्सची प्री-ऑर्डर सुरू झालीय. तसेच ग्राहकांना 8000 रुपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. याशिवाय HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 8000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com