ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अन् हेल्थ फीचर्ससह सॅमसंग कंपनी करणार Galaxy Ring लाँच; जाणून घ्या किंमत

Galaxy Ring Price: सॅमसंग कंपनी ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टफोन, स्मार्ट गॅजेट्स लाँच करत असते. आता कंपनी लवकरच भारतात Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी Galaxy Ring लाँच करु शकते.
Galaxy Ring
Galaxy RingGoogle

सॅमसंग कंपनी ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टफोन, स्मार्ट गॅजेट्स लाँच करत असते. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या गरजांचा विचार करुन अनेक नवनवीन गोष्टी बाजारात लाँच करत असते. आता कंपनी लवकरच भारतात Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी Galaxy Ring लाँच करु शकते.

सॅमसंगच्या Galaxy Ring मध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. या रिंग मध्ये हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग सिस्टीम असणार आहे. या रिंगमध्ये SpO2,हृदयाची गती, झोप याबद्दल माहिती मिळणार आहे. कंपनीच्या या रिंगमध्ये तुम्ही काय करता हे सर्व ट्रॅक करता येणार आहे. कंपनी ९ वेगवेगळ्या आकारत ही रिंग लाँच करु शकते. हे डिव्हाइस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते.

मीडिया रिपोर्टनुसार,कंपनीच्या Galaxy Ring ची किंमत भारतात ३५ हजार रुपये असू शकते. कंपनी हे प्रोडक्ट मासिक सबस्क्रिप्शनसह लाँच करु शकते. अमेरिकेत या रिंगची किंमत ३०० ते ३५० डॉलर्स असू शकते. या रिंगच्या मासिक सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला रिंगचे सर्व फीचर्स उपलब्ध असतील. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कंपनीची ही रिंग Oura Ring शी स्पर्धा करेन. या रिंगची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये २९९ डॉलर आहे.

Galaxy Ring
Samsung: क्या बात, क्या बात! मोबाईल तुटो किंवा फुटो तरी दुरुस्त करुन देणार कंपनी; Samsungची मोठी घोषणा

भारतात टेक्नॉलॉजीमध्ये सॅमसंग कंपनी सर्वात पुढे आहे. कंपनीची ही रिंग महाग आहे. परंतु या रिंगमध्ये अनेक फीचर्स मिळणार आहे. सध्या देशात बोट आणि नॉइज या ब्रँडच्या रिंग्स उपलब्ध आहेत. या रिंगची किंमत १० हजार रुपये आहे. गॅलेक्सी रिंगची किंमत ३५ हजार रुपये असू शकते.

कंपनी आपल्या Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये ही रिंग लाँच करु शकते. या इव्हेंटमध्ये कंपनी आपला Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 लाँच करु शकते.

Galaxy Ring
Petrol Diesel Price : नागरिकांना मोठा दिलासा! घरातून बाहेर पडण्याआधी तपासा पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com