PM Kisan Yojana : ८१ हजार शेतकऱ्यांना परत करावा लागेल 'किसान सन्मान निधी', लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का यात? चेक करा

Farmers Out From Scheme: ८१ हजार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana saam tv
Published On

PM Kisan Samman Nidhi Scheme:

पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दरवर्षी ६ हजारांची मदत केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना याचे १३ हफ्ते मिळाले आहे. अशातच शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

प्रधानमंत्री किसना सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणारं आहे त्यांना यातून बाहेर वगळले जात आहे. बिहार राज्यातील ८१ हजार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार शेतकरी आयकर आणि इतर कारणांमुळे पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरले जातील.

PM Kisan Yojana
Gold Silver Rate (11th September): सोन्याचा भाव पुन्हा घसरला, चांदीलाही सुगीचे दिवस; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

सरकारच्या (Governments) सुचनेनुसार या योजनेंतर्गत कोणाताही शेतकरी अपात्र घोषित झाल्यास त्यांना संपूर्ण पैसे (Money) परत करावे लागतील. हा परतावा ऑनलाइन (Online) किंवा ऑफलाइन पद्धतीने भरला जाऊ शकतो, कोणते शेतकरी अपात्र ठरतील हे कसे कळेल.

1. अपात्र शेतकरी कोणते?

पीएम किसानच्या वेबसाइट्सनुसार काही शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र नाहीत. यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कोणते शेतकरी येतात हे जाणून घेऊया.

2. हे शेतकरी अपात्र असतील.

  • सर्व संस्थागत जमीनधारक शेतकरी

  • कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी

  • घटनात्मक पदांवर असलेले लोक

  • माजी आणि सध्याचे मंत्री, राज्यमंत्री आणि लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा यासारखे लोक

  • सरकारी पदांवर काम करणारे कर्मचारी

  • लोकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते

  • आयकर भरणारे शेतकरी

  • डॉक्टर, इंजिनीअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट यांनाही याचा लाभ घेता येणार नाही.

PM Kisan Yojana
Besan Ladoo Side Effects : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com