कोमल दामुद्रे
सण जवळ आले की, आपल्या घरात खमंग बेसनाच्या लाडवाचा सुगंध दरवळू लागतो.
तोंडात टाकताच विरघळणारा लाडू आपण चवीचवीने खातो. परंतु, या लाडवामुळे आरोग्य बिघडू शकते.
बेसनाचा लाडू बनवताना साखर आणि तूपाचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते.
बेसनाच्या लाडू हा उच्च कॅलरीजचा आहार आहे. ज्यामुळे वजन वाढते.
बेसनाच्या लाडूचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले नाही, त्यामुळे रक्तातील साखरेचे पातळी वाढते.
बेसनाच्या लाडूचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
अतिप्रमाणात बेसनाच्या लाडवाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागतो.
बेसनाच्या लाडूचे अतिप्रमाणात सेवन केल्यास हृदयरोग जडू शकतो.