Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Marathi Breaking Live Headlines Updates : उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, अभिजित दिपकेंच्या घरी सीजीपीची बैठक, आरबीआय आज पतधोरण जाहीर कऱणार... राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; ५ हजारांची लाच घेताना सावर्डेचा मंडळ अधिकारी जाळ्यात

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. सातबारा उताऱ्यावर जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं. सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

विषारी दारु ने पुण्यातील हडपसर व पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी मध्ये एकूण २१ जणांचा झाला होता मृत्यू

विषारी दारु विक्री करणाऱ्या ९ जणांवर सी आय डी ने मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे

दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे, आकाश जाधव, योगेश व्हनकडे, राधेशाम प्रजापती, कल्पेश अग्रवाल, आर्यन धोत्रे, अभिषेक चौबे, अरुण चौबे आणि अंकित अरुण चौबे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत

दत्ता लोंढे याच्या टोळीवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांनी नवी मुंबईतून रसायन मागवून ते गावठी दारुमध्ये मिसळल्याने ही विषारी दारु पिऊन हडपसर, काळेपडळ येथील अनेकांचा मृत्यु झाला होता

हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास शासनाने सीआयडीकडे सोपविला

वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर वारंवार पालिकेकडून तोडक कारवाई केली जात असल्यामुळे आंदोलन छेडण्यात आले

शहरातील फेरीवाल्यांची बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.

फेरीवाल्यांकडून अनधिक्त कर वसूलणाऱ्या माफियांकडून अधिकाऱ्यांचे खिसे भरले जातात

यामुळेच बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप आंदोलन करत्यांनी केला आहे

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पेण जवळील बळवली दुरशेत परिसरात वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा

० मुंबई गोवा महामार्गावरील बळवली जवळून होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीमुळे झाली आहे वाहतूक कोंडी

० बळवली दुरशेत फाटा जवळ वाहतूक धिम्या गतीने

० गौण खनिजची वाहतूक करणाऱ्या डंपर ट्रक कंटेनरमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास

० कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या तिहेरी रांगा

पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त.

डीबी अर्थात डिटेक्शन ब्रांच मध्ये कार्यरत असणाऱ्या १३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात रवानगी..

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकावर मोठी कारवाई...

पंधरा दिवसापूर्वी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका दिवशी दोन वेळा फायरिंग झाली होती या फायरिंगच्या घटनांनंतर आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट कारवाई करत तपास फक्त बरखास्त केला आहे..

हर्षल दुडुम, किरण ठवरे कृष्णा गायकवाड विकास पांडुळे दिनेश गायकवाड शुभम केदारी अक्षय वाबळे विश्वजीत गोरे निलेश दिवटे भाऊसाहेब सोडमिसे पांडुरंग चंदिले आणि सैपन मुलुख नदाफ यांची थेट मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे..

Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणाच्या जलवाहिनीला सुरत बायपास महामार्गालगतच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये पुन्हा एकदा मोठी गळती लागली असून, यामुळे लाखो लिटर शुद्ध पाणी सर्रासपणे वाया जात आहे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्याच ठिकाणी जलवाहिनी पुन्हा फुटल्याचे समोर आले आहे,

विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी


नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान कोणतीही हिंसा केली नसल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. "ही लढाई विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही चुकीची कृती केलेली नाही," असे राहुल गांधी म्हणाले.

विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम; पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील शाळांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करण्यासाठी ३ ते १८ ऑगस्ट या कालावधीत राज्यस्तरावरून जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. एकूण ३ लाख २४ हजार २७ विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रीक (MBU) अद्ययावत करणे प्रलंबित आहे. - याची 80 शब्दात मराठीत बातमी लिहून दे हेडिंग सह

डी. वाय पाटील यांना पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात...

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक डॉ. डी. वाय. पाटील यांना पोलिसांकडून शासकीय मानवंदना देण्यात आल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. कुटुंबीय, राजकीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत

विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड झाली होती.

बसची स्टेरिंग अचानक लॉक झाल्यामुळे बस जाग्यावरच बंद पडली होती

आज दुपारी एक वाजताची ही घटना आहे

उड्डाण पुलावर बस अचानक बंद पडल्यामुळे भीषण अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती

चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पुन्हा एकदा मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर महापौरांविरोधात जोरदार निदर्शने केली, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी सभेवर काहीकाळ बहिष्कार टाकत कोरम पूर्ण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले.

सुनेत्रा पवारांवरील आक्षेपार्ह टीकेच्या निषेधार्थ बीडमध्ये काँग्रेस नेत्यांच्या पुतळ्याला आसुडाचे फटकारे देत निषेध आंदोलन

काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल 'गुंगी गुडिया' असे वक्तव्य केल्यामुळे बीडमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संताप दिसुन येत आहे. या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात 'पार्थ-जय' प्रतिष्ठान आणि समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात केली भात लागवड

मुंबईतील शाळेच्या विद्यार्थ्यांची आज कर्जत संशोधन केंद्रात कृषी पर्यटन सहल होती

सोबत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथोल कुलगुरू डॉ संजय भावे व इतर अधिकारी व शेतकरी होते उपस्थित

पंढरपुरात दोन नद्यांची दोन रूपं

पंढरपुरात चंद्रभागा आणि माण नदीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली आहेत. एकीकडे चंद्रभागेला पूर तर दुसरीकडे अवघ्या काही अंतरावर असलेली माण मात्र कोरडी ठाक. निसर्गाच्या या चमत्काराचा खेळ येथील शेतकरी अनुभवत आहे.

दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येत आहे. सुरुवातीला त्यांच्यावर धार्मिक विधी करण्यात येतील त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना दिली जाईल. मानवंदना दिल्यानंतर डॉ डी वाय पाटील यांची अंत्ययात्रा सुरू होईल.

पुणे- विमानानगरमध्ये झीशान हॉटेलमध्ये आगीची घटना

आगीत हॉटेल जळून खाक झालं आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये जीवितहानी झालेली नाही. दरम्यान यावेळी आगीचं कारण अस्पष्ट आहे. यावेळी अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली.

अग्रलेखाचा निषेध करतो, रोहित टिळकांची संजय राऊत यांच्यावर टीका

ईस्ट इंडिया कंपनीला टिळक पुरस्कार अशा नावाने प्रसिद्ध केलेल्या सामना ने अग्रलेखातून थेट टीकास्त्र झाडले आहे. पुण्याचे तेज, प्रतिष्ठा कमी करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्या कृत्यात महान लोकमान्य टिळकांचे वंशज असावेत हे बरे नाही. दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मिंध्यांना महादजी शिंदे पुरस्कार देणे व डोवाल साहेबांना 'टिळक' पुरस्कार देणे हे महाराष्ट्रीय समाजाचे अधःपतन असल्याचं मत सामना ने अग्रलेखातून लिहिलं आहे. यावर आता लोकमान्य टिळकांचे खापरपणतू रोहित टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा युक्तिवाद; कपिल सिब्बल यांनी मांडला घटनाक्रम

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात महत्त्वाच्या तारखांची यादी सादर करत ठाकरे गटाची बाजू मांडली.

शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा सांगलीत राष्ट्रवादीकडून निषेध 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालया समोर निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी सपकाळ याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.. यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी 

शिवसेनेतील (उद्धव ठाकरे गट) फुटीनंतर आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या २०२४ च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे गटालाच 'अधिकृत शिवसेना' म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही आजच्या कामकाज यादीत (List) समाविष्ट करण्यात आली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आंबोलीमधील दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्कू टीमला यश

आंबोली महादेवगड पॉईंट येथे काल दरीत कोसळलेल्या निपाणी येथील आयुब सय्यद या पर्यटकाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात रेस्कु टीमला यश मिळाले. शोध घेण्याची मोहीम आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती मात्र, दाट धुक्यामुळे शोध कार्यास उशीर होत होता. अखेर दरीत जवळपास ७०० फूट खाली मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आला. घटनास्थळी सावंतवाडी पोलीस उपस्थित असून काही वेळात मृतदेह सय्यद कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येईल.

साम टीव्ही च्या बातमीची प्रशासनाने घेतली दखल! खड्ड्यांची बातमी दाखवल्यानंतर तातडीने खड्डे बुजवायला सुरुवात 

नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या विसरवाडी खेतीया राष्ट्रीय महामार्गावर नंदुरबार शहरा लगत असलेल्या करण चौफुलीवर दीड ते दोन फुटांपर्यंत भले मोठे खड्डे पडलेले होते त्यामुळे दररोज अपघातांची संख्या वाढत होती या संदर्भातील बातमी साम टीव्ही ने प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने याची तातडीने दखल घेत आता खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे करण चौफुली परिसरातील सर्व खड्ड्यांची डागडुजी ही सुरू करण्यात आलेली आहे खड्ड्यांमध्ये खडी टाकून खड्डे बुजवले जात आहे यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून नंदुरबार मध्ये पुन्हा एकदा साम टीव्हीच्या इम्पॅक्ट पाहायला मिळतोय....

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निर्मला मरकड यांची निवड करण्यात आली.17 संचालक असलेल्या या बँकेत अडीच वर्षापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन पक्षाच मताधिक्य होत, अडीच वर्षापूर्वी अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ताब्यात होत. आता अडीच वर्षानंतर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आल आहे.

कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर नगरसेवक बनलेल्या रेखा अंबुरे-सरवदे यांचे जात प्रमाणपत्र रद्द

बोगस व बनावट कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून नगरपालिकेची निवडणूक लढवून वॉर्ड क्रमांक १ मधून नगरसेवक बनलेल्या सौ. रेखा अंकुश अंबुरे-सरवदे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांनी रद्द करून जप्त केल्याने माजलगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेस पक्षाची नियत खराब झालेली आहे - आ. सुरेश धस ऑन गुंगी गुडिया

काँग्रेस पक्षाकडे सध्या काही राहिलेले नाही. काँग्रेस पक्षाची नियत खराब झालेली आहे.काँग्रेसने रिकामटेकडे उद्योग करू नये.गुंगी गुडिया म्हणायचं किंवा बीडच्या पत्रकार परिषदेमधून ट्रॉल करायचं हे उद्योग थांबवले पाहिजे. अजित दादा यांच्या दुःखातून आणखी महाराष्ट्र सावरला नाही अशा वेळेस असे विधान करणे काँग्रेसने थांबवलं पाहिजे.

- आमदार सुरेश धस भाजपा

लातूर जिल्ह्यात 68 सोयाबीन बियाण्यांचे नमुने फेल; 40 कंपन्यांविरोधात कोर्ट केस दाखल

लातूर जिल्ह्यात यंदाही सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यातील जवळपास 429 तक्रारी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्यात,कृषी विभागाच्या तपासणीत जिल्ह्यातील 68 सोयाबीन बियाण्यांचे नमुने अप्रमाणित ठरले असून, तब्बल 40 कंपन्यांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

शहरातील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग करून आकाशवाणी चौकात पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी 

- आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितला. कोर्टाने आज युक्तिवाद होणार.

- निशाणी क्रमांक 211, 212 आणि 213 या अर्जामध्ये एकत्रित दोषारोप पत्र करता येत नाहीत. असा अशाचे अर्ज आहे.. या संदर्भात आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला ते प्रकरण प्रलंबित आहे म्हणून कोर्टाने या तीन अर्ज तात्पुरत्या स्वरूपात आहे त्या परिस्थितीत ठेवले आहेत. अशी माहिती

Pune : पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

डमी डिलिव्हरी बॉयच्या "स्टिंग ऑपरेशन" नंतर पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई

पुणे पोलिसांनी डमी तक्रारदार पाठवून केली पडताळणी

तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा

Palghar : पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग

पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यातील काही भागाला भीषण आग. अर्थ इंटरप्राईजेस या कारखान्यात आग. स्टोअर केलेल्या केमिकलला आग लागल्याची प्राथमिक माहिती . अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल . आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर . सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही .

वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांच्या गच्छंती नंतर राष्ट्रवादीचे महिला परदेशाध्यक्ष पद होतं रिक्त

मुंबईत आज सुनेत्रा पवार यांनी नागवडे यांना नियुक्तीपत्र दिले

पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

पुण्याला पाणीपुरवठा करणारे धरणं १०० टक्के भरल्याने दिलासा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणं १०० टक्के भरली

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या ३ दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरूच

खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू

गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के पाणीसाठा जास्त

झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत

अमेरिकेच्या दबावामुळेच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला असा गंभीर आरोप भारतीय किसान युनियनचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी नांदेडात केलाय. माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून केंद्र सरकारवर शेतकरी नेते टिकेत यांनी जोरदार टीका केलीय. कृषी आणि व्यापार करार होण्यासाठी भारतीय संसद चालणे आवश्यक होते आणि विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सतत संसद बंद पाडत होते. या करारा बाबत चर्चा होणे आवश्यक होते. त्यामुळे सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याचा दावा टिकेत यांनी केलाय

नंदुरबारमध्ये तलवार आणि कुकरीसह फिरणारा इसम जेरबंद

महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या झाशीची राणी पथका ने नंदुरबार शहरातील जी.टी.पी. कॉलेज परिसरात तलवार आणि कुकरी घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला जेरबंद केलं आहे.गस्तीवर असताना पथकाला भावेश संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोनेरी मूठ असलेली लोखंडी तलवार आणि एक कुकरी मिळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली असून, त्याच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा काटेवाडीत निषेध; ग्रामस्थांचे जोडे मारो आंदोलन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केल्याचा आरोप करत काटेवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काटेवाडीत ग्रामस्थांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

जळगावजामोद तालुक्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेती, घरे, जनावरे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान, निष्पक्ष पंचनामे तसेच महापुरात मृत्यू झालेल्या महादेव वाघोदे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने तहसीलदारांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Nanded : वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नांदेड शहरातील खडकपुरा परिसरात वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

काल रात्री उशिरा खडकपुरा परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला.

शुऐब हे वीजेच्या खांबावर नेमके कोणत्या कारणासाठी गेले होते, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली..

बोगस प्रमाणपत्र प्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी थेट निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक केली..

बनावट प्रमाणपत्राचे सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक असं थेट कनेक्शन, सेल्समन एजंट निघाला मास्टरमाइंड

आंबोली महादेवगड दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा शोध सुरू

आंबोली महादेवगड पॉईंट येथे काल दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा शोध घेण्याची मोहीम आज सकाळ पासून सुरू करण्यात आली आहे. काल दाट धुके व काळोख यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती. बेळगाव निपाणी येथील नऊ जणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी आंबोलीत आला होता. त्यातील आयुब सय्यद नावाचा पर्यटक चारशे फुट खोल असलेल्या दरीत कोसळला. त्यानंतर ताबोडतोब रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले होते मात्र नैसर्गिक अडथळे येत होते. काल थांबवलेली शोध मोहीम आज पुन्हा सकाळी सुरू करण्यात आली आहे. मात्र दाट धुक्क्यामुळे शोध मोहीमेला अडथळा येत आहे.

Nashik : मका पिकावर लष्करी व तुडतुडे अळीचा प्रादुर्भाव

-नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाला असला तरी अद्याप पर्यंत पूर्व भागात हवा तसा पाऊस झालेला नाही,अशाच परिस्थितीत शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली खरी मात्र सध्या मक्यावर लष्करी अळी बरोबरच तुडतुडे अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांना महागडी औषध फावरणीची वेळ आली आहे,औषध फवारणी करूनही फारसा फायदा होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात पडलाय

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा काटेवाडीत निषेध; ग्रामस्थांचे जोडे मारो आंदोलन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केल्याचा आरोप करत काटेवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काटेवाडीत ग्रामस्थांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया सुरू

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवस्थापक समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (२०२६ ते २०३१) प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत २१ नोव्हेंबर २०२६ला पूर्ण होत आहे. जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बँकेच्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या दोन सप्टेंबरपर्यंत ठराव पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे.

आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आला आहे. सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह जोरात असून पाण्यासोबत लहान-मोठे दगड वाहून येण्याची शक्यता आहे. हे दगड पर्यटकांच्या अंगावर कोसळून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे.

थकबाकी मागितल्याने सुरक्षारक्षकाचा खून

मुक्ताईनगर,थकीत पगाराची मागणी केल्याच्या रागातून ढाबामालकाने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात काठीने मारहाण केली. ही घटना मुक्ताईनगर - बऱ्हाणपूर महामार्गावरील उचंदा शिवारात घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय सुरक्षारक्षकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. गोकुळ तारासिंग जाधव (वय ५५, रा. मुक्ताईनगर, मूळ रा. निंबादूर, जि. बऱ्हाणपूर) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यामुळे अपघात, दोघे गंभीर जखमी

- खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकी घसरून अपघात

- कुणाल महाले आणि प्रभाकर माने गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

- दोघांनाही ८ ते १० टाके पडल्याची माहिती

- हिरावाडीतील अमृतधाम परिसरात घडली घटना

- खड्ड्यामुळेच अपघात झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप

- अमृतधाम परिसरातील खड्डे तातडीने बुजवण्याची स्थानिकांची मागणी

परतीच्या वाटेवरील संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे उद्या पुण्यात आगमन

आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासावरील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या पुण्यात आगमन होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात, तर तुकाराम महाराजांची पालखी नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहणार आहे. मंदिरांमध्ये फुलांची सजावट, रोषणाई, वारकऱ्यांच्या मुक्कामासह धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे.

राज्य शासनाने काढलेला कामगार विभागाचा 13 जुलैचा अध्यादेश रद्द करावा यासाठी कामगार संघटना आक्रमक

राज्य शासनाच्या कामगार विभागणी 13 जुलैला काढलेला अध्यादेश बांधकाम कामगारावर घोर अन्याय करणारा असून तो रद्द करावा या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक झाली असून कामगार संघटनेने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे.शासन हे कामगारावर अन्याय करणारा निर्णय घेत असेल तर तो अन्याय आम्ही हाणून पाडू जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही याच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून लढा सुरू ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितल आहे.

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक,अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत...

जालना जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत आहे.जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अडीच वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती. त्यामुळं आज होणारी निवडणूक देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान अडीच वर्षांपूर्वी निवडप्रक्रियावरून भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे हे आमने सामने आले होते. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे अध्यक्षपद आणि भाजपकडे उपाध्यक्षपद असा फॉर्म्युला ठरला होता.आता अडीच वर्ष पूर्ण झाल्याने पुन्हा निवडणूक होत आहे.

सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडीया म्हटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे शब्द मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी, अशीही पत्राद्वारे मागणी केली आहे.

धानोरा महासिद्ध येथे पारंपरिक गोवर्धन पूजा व रथोत्सव उत्साहात संपन्न

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील श्री महासिद्ध संस्थानमध्ये पारंपरिक गोवर्धन पूजा व रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी सातपुड्याच्या पायथ्याशी जाऊन देव व गोमातेची पूजा केली. मानाचा झेंडा चढवून धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले तसेच गुरांना भाकऱ्या खाऊ घालण्याची परंपराही पार पडली. विशेष म्हणजे पूजा संपताच परिसरात पावसाने हजेरी लावल्याने भाविकांनी याला वरुणराजाची कृपा मानले. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून चांगल्या हंगामाची आशा व्यक्त केली जात आहे...

सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश

सायबर फसवणुकीसाठी 'म्युल अकाउंट' म्हणजेच बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटद्वारे देशभरातील 65 नागरिकांची तब्बल 150 कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.आळंदी पोलिसांनी आरोपी सचिन काळे याला अटक केली आहे.

यवतमाळमध्ये सायबर रॅकेटचा भांडाफोड

सायबर फसवणुकीतील काळा पैसा स्वीकारण्यासाठी स्वतःचे बँक खाते म्युल अकाउंट म्हणून वापरू देणाऱ्या आणि नागरिकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सहा नागरिकांची तब्बल सहा लाख 93 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

अडोळी ते अटकळी पांदण रस्ता आणि पुलाची अवस्था झाली दयनीय

वाशिम तालुक्यातील अडोळी ते अटकळी या पांदण रस्त्याची आणि पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून पूल तुटलेल्या अवस्थेत असून रस्ताही पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात अडकल्या झाडांच्या फांद्या, ओंडके आणि कचरा

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील धामणी येथील अरुणावती नदीला आलेल्या मोठ्या पुरानंतर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या, ओंडके आणि इतर कचरा अडकून पडला आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बाधित होत असून बंधाऱ्याजवळ पाणी अडत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com