Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १६ सरकारी नोकऱ्या धुडकावल्या; पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS तृप्ती भट्ट आहेत तरी कोण?

Success Story Of IPS Trupti Bhatt: आयपीएस तृप्ति भट्ट यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी १६ सरकारी नोकऱ्यांना नकार दिला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचे अनेकांचे स्वप्न असते. प्रशासकीय सेवेत कार्यरत होऊन समाजात काही बदल घडवून आणण्याची इच्छा असतात. यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. आयपीएस तृप्ति भट्ट हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक करण्यासाठी त्यांनी १६ सरकारी नोकऱ्या धुडकावल्या आहेत.

आयपीएस तृप्ति भट्ट यांनी इस्त्रोतदेखील (ISRO) काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांनी या नोकरीलादेखील नकार दिला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.

आयपीएस तृप्ति भट्ट या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी २०१३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी पहिल्या प्रयत्नात १६५ रँक प्राप्त केली आहे.

तृप्ति या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांनी अल्मोडा येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालयातून केले. यानंतर पंतनगर युनिव्हर्सिटीमधून मॅकेनिकल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली. यानंतर एनटीपीसी या कंपनीत नोकरी केली.

तृप्ति यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. चार भावंडांमध्ये तृप्ति या मोठ्या होत्या. त्या जेव्हा नववीत होत्या. तेव्हा त्यांची भेट एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी झाली. यानंतर त्यांनी देशासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

आयपीएस तृप्ति यांनी पहिल्याच प्रयत्नात १६५ रँक प्राप्त केली. त्यांनी अनेक पदांवर काम केले आहे. त्यांच्या कामाचे नेहमी कौतुक होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत आंदोलन झालं त्यासाठी मनोज जारांगेना जागा मी देण्यास मदत केली - धंनजय मुंडे

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT