Success Story: एकाच कुटुंबात 1 IPS, 3 IAS अन् 5 RAS अधिकारी, कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक करणाऱ्या फराह हुसैन आहेत तरी कोण?

Success Story Of IAS Farah Husain: फराह हुसैन यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाचे बाळकडू मिळत होते. त्यांच्या कुटुंबातील १४ जण सरकारी सेवेत कार्यरत आहेत.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. असंच स्वप्न फराह हुसैन (Farah Husain) यांचं होतं. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी क्रॅक केली आहे. त्या वयाच्या २६ व्या वर्षी आयएएस बनल्या आहेत. फक्त फराह नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील १४ सदस्य हे खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत. फराहसोबतच त्यांच्या घरात अजून ३ आयएएस अधिकारी आहेत.

Success Story
Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; कोणत्याही क्लासशिवाय मिळवली दुसरी रँक; IAS गरिमा लोहिया यांचा प्रवास

फराह हुसैन (IAS Farah Husain) या मुळच्या राजस्थानच्या आहेत. फराह यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. मुलीदेखील मोठ्या पदावर काम करु शकतात हे त्यांनी दाखवले आहे.

फारह यांच्या कुटुंबातील अनेकजण सरकारी नोकरी करतात. त्यांचे वडिल अशफाफ हुसैन हे जिल्हा कलेक्टर होते. त्यांचे भाऊ हाय कोर्टात वकील आहेत. फराह हुसैन यांचे काका पोलिस होते. तर अजून एक काका राज्य सरकारमध्ये संयुक्त सचिव होते.तसेच दोन भाऊ आरएएसमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबातील एकूण १जण चांगल्या पदावर काम करत आहेत.

फराह यांना लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे होते. त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कायदा विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी क्रिमिनल वकील म्हणून कामदेखील केले. परंतु त्यांची प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती.

फराह यांनी २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय त्यांनी मेहनतीने परीक्षा पास केली. त्यानंतर त्या राजस्थानमध्ये आयएएस अधिकारी बनल्या.

Success Story
Success Story: विराट कोहलीकडून प्रेरणा, कधीही न हारण्याची जिद्द, पहिल्याच प्रयत्नात तिसरी रँक, वाचा IAS अनन्या रेड्डी यांचा प्रवास

फराह हुसैन यांना लहानपणापासूनच अभ्यासाचे बाळकडू मिळत होते. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण खूप हुशार होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत फराह यांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि क्रॅकदेखील केली.

Success Story
Success Story: पोरानं बापाचे नाव मोठं केलं,फक्त २० व्या वर्षी पायलट झाला, अंबरनाथच्या लेकाची ठाण्यात चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com