Success Story: परदेशात शिक्षण; तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; लंडन रिटर्न प्रणिता दाश यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Pranita Dash: आयएएस प्रणिता दाश यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. प्रणिता दाश यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून शिक्षण पूर्ण केले.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा ही सर्वात अवघड असते. यूपीएससी परीक्षेत अनेकांना पहिल्या प्रयत्नात अपयश येते. अनेकांना तर खूप वेळा अपयश येते.परंतु तरीही प्रयत्न करत राहिले तर यश हे नक्कीच मिळते. असंच काहीसं प्रणिता दाश यांच्यासोबत झालं. आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी परदेशातील चांगल्या पगाराची नोकरीदेखील सोडली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

Success Story
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही क्लासशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक ; २२ व्या वर्षी IAS झालेल्या अनन्या सिंह आहेत तरी कोण?

आयएएस प्रणिता दाश या ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील एका लहान गावातील रहिवासी. त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण आपल्या गावीच केले. यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी भुवनेश्वर येथे गेल्या. त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रणिता यांनी सेंट झेवियर्स कॉलेज कोलकत्ता येथून इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

कोलकत्तामध्ये मास्टर्स केल्यानंतर त्या लंडनला गेल्या. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांना युनिव्हर्सिटीकडून स्कॉलरशिप मिळाली. मास्टर्स करताना त्यांनी यूपीएससी परीक्षा द्यायला सुरु केली. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच स्पर्धा परीक्षा द्यायचे ठरवले होते.

प्रणिता दाश यांनी क्रँब्रिज युनिव्हर्सिटीमधून एमफिलदेखील केले. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु ठेवली होती. त्यांना दोन प्रयत्नात अपयश मिळाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. या दोन्ही वेळेला फक्त दोन गुणांनी त्या प्रिलियम्स परीक्षा पास करु शकल्या नाही.

प्रणिता यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. त्यांना २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक ४२ मिळाली. यानंतर त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. प्रणिता यांनी २०२२ मध्ये मेन्स परीक्षा देऊन पुन्हा कँब्रिज येथे गेल्या.त्यांनी मेन्स क्लिअर झाले तर इंटरव्ह्यूची तयारी केली.

Success Story
Success Story: एकाच कुटुंबात 1 IPS, 3 IAS अन् 5 RAS अधिकारी, कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक करणाऱ्या फराह हुसैन आहेत तरी कोण?

प्रणिता यांनी एमफिल आणि यूपीएससी (UPSC) या दोन्ही गोष्टींना व्यवस्थित वेळ दिला. त्या सकाळी एमफिलचा अभ्यास करायच्या तर संध्याकाळी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायच्या.त्यांनी दिवसरात्र एक करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Success Story
Success Story: डॉक्टर झाल्या, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; आधी IPS मग IAS; मुद्रा गैरोला आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com