
सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या (एसटीएफ) 'स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट' या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांना प्रत्यक्ष मैदानावर क्रिकेटच्या दिग्गजांना अॅक्शनमध्ये पाहण्याची अनोखी संधी मिळाली.
डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये भारत मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स या संघांसोबत ही मुले मैदानावर उतरली आणि राष्ट्रगीताचे सूर उमटत असताना सचिन तेंडुलकरच्या शेजारी उभी राहिली, त्यावेळी त्यांना वाटणारा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
इंटरनॅशनल मास्टर्स लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारत मास्टर्स संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. या सामन्यातील पहिल्या डावात भारत मास्टर्सच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करुन इंग्लंड मास्टर्स संघाला १३२ धावांवर रोखलं. या धावांचा पाठलाग करताना भारत मास्टर्स संघाने शानदार विजय मिळवला.
भारत मास्टर्स संघाला या सामन्यात जिंकण्यासाठी १३३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर आणि गुरकीरतक मान यांनी दमदार सुरुवात करुन दिली. गुरकीरत मानने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर सचिन तेंडुलकरने ३४ धावा चोपल्या. तर युवराज सिंगने शेवटी२७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारत मास्टर्सने ९ गडी राखून विजय मिळवला.
भारत मास्टर्स संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ करुन दाखवला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत मास्टर्स संघाने श्रीलंका मास्टर्स संघावर शानदार विजय मिळवला होता. आता इंग्लंड मास्टर्सला पराभूत करत भारत मास्टर्सने सलग २ सामन्यांमध्ये २ विजयाची नोंद केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.