Ind Vs Pak : यांना कुठं आलं इतकं डोकं... पाकिस्ताननं ती एक चूक पकडली असती, तर टीम इंडिया आली असती संकटात

Ind vs Pak Match Highlights : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारताकडून एक छोटीशी चूक झाली होती. ही चूक विराट कोहलीकडून झाली होती. ही चूक जर पाकिस्तानने ओळखली असती, तर भारत सामना जिंकू शकला नसता.
virat kolhi ind vs pak
virat kolhi ind vs paksaam tv
Published On

Virat Kohli : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तावर ६ गडी राखून मात केली. टीम इंडियाच्या विजयामध्ये विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. विराट कालच्या सामन्यात 'प्लेयर ऑफ द मॅच' बनला. सामन्यात विराटने १०० धावा केल्या. खेळीत विराटने फक्त ७ चौकार मारले. वनडे फॉरमॅटमध्ये विराटने ५१ वे शतक केले.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात एक प्रसंग असा आला जेव्हा विराट कोहली त्याच्या एका चुकीमुळे बाद होऊ शकला असता. कोहलीने ४१ धावा केल्या होत्या. त्यादरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूंने बॉल विकेट्सवर थ्रो केला होता. तेव्हा विराटने बॉल हाताने रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विराट कोहलीने क्रीज ओलांडली होती.

आयसीसीच्या नियमांनुसार, थ्रो केल्यानंतर फलंदाजाने हाताने बॉल राखणे किंवा अडवणे अयोग्य होते. त्याची कृती आयसीसीच्या नियमांच्या विरोधात होती असे म्हटले जात आहे. या नियमाला 'Obstructing the Field' असे म्हणतात. या नियमामुळे विराट ४१ धावांवर बाद होऊ शकला असता. पण त्यावेळी पाकिस्तानच्या संघाने अपील केले नाही. त्यामुळे कोहली बाद होता-होता राहिला.

virat kolhi ind vs pak
कोण आहे हार्दिकची नवी गर्लफ्रेंड, भारत-पाकिस्तान सामन्यात दिसली झलक

आयसीसीच्या नियमांनुसार,

१. खेळ सुरु असताना एखाद्या फलंदाजाने जाणूनबुजून त्याच्या शब्दांनी किंवा कृतीने क्षेत्ररक्षकाच्या मार्गात अडथळा आणण्याचा किंवा त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला, तर यावरुन फलंदाजाला मैदानाबाहेर जावे लागू शकते.

२. हातात बॅट नसलेल्या फलंदाजाने हाताने मुद्दामून बॉल मारला, तर फलंदाज बाद होऊ शकतो. हा नियम स्ट्रायकर आणि नॉन-स्ट्रायकर दोघांनाही लागू पडतो.

३. हा नियम नो-बॉल असतानाही लागू होतो.

virat kolhi ind vs pak
Ind vs Pak : रोहित शर्मा आऊट होताच मालवणमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, संतापलेले शेकडो लोक उतरले रस्त्यावर

हारिफ रौफने कालच्या सामन्यात २१ व्या ओव्हर टाकली. तेव्हा ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विराटने एक धाव काढली. तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूने नॉन-स्टायकर एन्डवर बॉल थ्रो केला. तोपर्यंत विराट क्रीजपर्यंत पोहोचला होता. थ्रो केलेला बॉल विराटने अडवला. जर त्यावेळी पाकिस्तानने अपील केले असते, तर विराट बाद झाला असता.

virat kolhi ind vs pak
Ind vs Pak : बाय बाय पाकिस्तान! सलग दुसऱ्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानची उडवली खिल्ली, मीम्स पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com