ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आहे. यांची फॅन-फॅालोइंग खूप मोठी आहे.
परंतु अनेकांना हे माहीतच नाही की क्रिकेट विश्वातील या दिग्गजांच्या नावांवर भारतात रेल्वे स्टेशन आहे.
सचिन रेल्वे स्टेशन हे गुजरातच्या सूरत शहरात आहे. कोहली रेल्वे स्टेशन महाराष्ट्राच्या नागपूर शहरात स्थित आहे.
हे नाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावावर ठेवण्यात आले नसून हे केवळ एक योगायोग आहे. आजपर्यंत सचिन आणि विराट हे दोघांनी एकदाही या स्टेशनला भेट दिलेली नाही.
हे दोन्ही रेल्वे स्टेशन या दोन्ही खेळाडूंच्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वात आहे. म्हणजेच या स्टेशनचे नाव विराट आणि सचिनची लोकप्रियता पाहून ठेवलेले नाही.
सचिन रेल्वे स्टेशन हे गुजरातच्या सूरत शहरात आहे.हे स्टेशन मुंबई-अहमदाबाद- जयपूर - दिल्ली लाइनवर स्थित आहे. सुनिल गावस्करांनी २०२३ मध्ये या रेल्वे स्टेशनचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी काही फोटो शेअर केले होते.
कोहली रेल्वे स्टेशन नागपूर सीआर रेल्वे डिवीजनच्या अंतर्गत भोपाल - नागपूर लाइनवर स्थित आहे.