Shocking: मासिक पाळी आल्याची शिक्षा, वर्गाबाहेर काढलं; पायऱ्यांवर बसून विद्यार्थिनीने दिली परीक्षा; पाहा धक्कादायक VIDEO

13-Year-Old Student Humiliated in Classroom Over Periods: तामिळनाडूतील आठवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय दलित विद्यार्थिनीला शाळेत जातीय भेदभावाचा सामना करावा लागला आहे.
Tamilnadu
TamilnaduSaam
Published On

दक्षिण भारतात मासिक पाळीला महत्त्व आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मंजल निरट्टू विज्हा या परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो. पण याच धर्तीवर तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय दलित विद्यार्थिनीला पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यामुळे तिला वर्गातून बाहेर काढले आहे. तसेच तिला पायऱ्यांवर बसवले आणि तिथेच परीक्षा देण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ तिच्या आईने शूट केला आणि सोशल मीडियात व्हायरल केला.

व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीची आई सांगते की, शाळेतील शिक्षकांना मुलीला मासिक पाळी येणार असल्याचे समजताच मुख्यध्यापकांनी तिला वर्गाबाहेर बसवले. तसेच व्हिडिओ शूट करत आई रागाने, जर एखाद्या मुलीला मासिक पाळी येत असेल तर, ती वर्गात बसू शकत नाही का? तिने वर्गाबाहेर बसून परिक्षा द्यावी का? असा सवाल उपस्थित केला.

Tamilnadu
Hospital: सोलापुरातील रूग्णालयाचा भोंगळ कारभार, प्रसूत महिलेलाच स्वत:ची स्वच्छता करण्याची आली वेळ

या प्रकरणावरून जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Tamilnadu
MHADA Home: "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य" शिल्लक घरांसाठी म्हाडाची बंपर लॉटरी; कधी अन् कुठे अर्ज करणार? वाचा

प्राथमिक चौकशीतून काय समोर आले?

शालेय शिक्षण विभाग आणि प्राथमिक तपासातून असे निष्पन्न झाले की, विद्यार्थिनीच्या आईने स्वत: तिच्या मुलीची पहिली मासिक पाळी असल्याने वेगळी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "विद्यार्थिनीच्या मासिक पाळी ५ एप्रिल रोजी सुरू झाली. तिने ७ एप्रिल रोजी विज्ञानाची परिक्षा दिली. तसेच ९ एप्रिल रोजी सामाजिक शास्त्राची परीक्षा पायऱ्यांवर बसून दिली आहे."

यावर विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, वेगळी व्यवस्था मागितली होती, पण याचा अर्थ असा होत नाही की, मुलीने शाळेच्या पायऱ्यांवर बसून परीक्षा द्यावी. या घटनेवर त्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. या घटनेचा सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com