Success Story: डॉक्टर झाल्या, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; आधी IPS मग IAS; मुद्रा गैरोला आहेत तरी कोण?

Success Story Of IAS Mudra Gairola: आयएएस मुद्रा यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आले परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करण्यासाठी त्यांचेदेखील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करतो. असंच काहीसं मुद्रा गैरोला यांनी केलं. आधी डॉक्टर झाल्या. परंतु वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.आधी आयपीएस झाल्या त्यानंतर आयएएस झाल्या. (Success Story Of IAS Mudra Gairola )

Success Story
Success Story: नांदेडच्या शेतकऱ्याची कमाल! औषधी मिरचीच्या उत्पादनातून ६ महिन्यात ४५ लाखांची कमाई

मुद्रा गैरोला (IAS Mudra Gairola) या मूळच्या उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील रहिवासी. त्या दिल्लीला राहतात. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती.त्यांना १०वीच्या परीक्षेत ९६ टक्के मिळाले होते. १२वीला ९७ टक्के मिळाले होते. त्या खूप चांगले काम करत आहेत. त्या अशा पहिल्या आयएएस अधिकारी आहेत ज्यांना किरण बेदी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

१२वीनंतर मुंबई गाठली

मुद्रा गैरोला यांनी १२वीची परीक्षा दिली. त्यानंतर त्या मुंबईला आल्या. त्यांनी मुंबईतील एका कॉलेजमधून बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटर सर्जरी कोर्समध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी बीडीएसमध्ये गोल्ड मेडल मिळवले. यानंतर त्या दिल्लीला परत गेल्या. त्यांनी उच्च शिक्षणासाठी एमडीएसमध्ये अॅडमिशन घेतले. परंतु त्यांच्या वडिलांना आपल्या लेकीने आयएएस व्हावे,असं वाटतं होते.

Success Story
Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २२ व्या वर्षी IAS झालेले अरुणराज आहेत तरी कोण?

वडिलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले

मुद्रा यांच्या वडिलांनाच आयएएस व्हायचे होते. परंतु काही कारणाने त्यांचे हे स्वप्न अर्धवट राहिले. त्यामुळे लेकीने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली.

दोनदा अपयश

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्यांदा २०१८ मध्ये त्यांनी यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षा क्रॅक केली. त्या इंटरव्ह्यू राउंडपर्यंत पोहचल्या. परंतु त्यांचे सिलेक्शन झाले नाही. २०२० मध्ये त्या मेन्स परीक्षा क्रॅक करु शकल्या नाही.

Success Story
Success Story: विराट कोहलीकडून प्रेरणा, कधीही न हारण्याची जिद्द, पहिल्याच प्रयत्नात तिसरी रँक, वाचा IAS अनन्या रेड्डी यांचा प्रवास

आयएएस मुद्रा यांनी २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. तेव्हा त्यांना १६५ रँक मिळाली. त्या आयपीएस झाल्या. परंतु वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा दिली. २०२२ मध्ये त्यांनी ५३ रँक मिळाली. त्या आयएएस म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या वडिलांनीही १९७३ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली होती. परंतु इंटरव्ह्यूमध्ये ती सिलेक्ट नव्हती झाली. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने हा निर्णय घेतला.

Success Story
Success Story: द रबर गर्ल ऑफ इंडिया! अन्वी झांझरूकियाचा प्रेरणादायी प्रवास करेल थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com