Success Story: नांदेडच्या शेतकऱ्याची कमाल! औषधी मिरचीच्या उत्पादनातून ६ महिन्यात ४५ लाखांची कमाई

Success Story Of Nanded Farmer: नांदेडच्या नागोराव बेंद्रे या शेतकऱ्याने १५ एकरात औषधी मिरचीची लागवड केली होती. त्याने यातून फक्त ६ महिन्यात ४५ लाखांची कमाई केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने औषधी मिरचीचे उत्पादन घेतले आहे. या मिरचीच्या शेतीतून शेतकरी प्रति एकर ३ ते ४ लाख रुपये कमवत आहे. औषधी मिरचीच्या शेतीसाठी त्यांनी एका कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी त्यांच्याकडून २२५०० रुपयांना मिरची खऱेदी करते. शेतकऱ्याला या मिरचीतून प्रति एकर ३ लाख रुपये नफा होत आहे.

Success Story
Success Story: दोस्ती असावी तर अशी! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली, आता तिघेही न्यायाधीश, शिरुरच्या ३ मित्रांची यशोगाथा

नांदेडमधील नागोराव बेंद्रे या शेतकऱ्याने ही शेती केलेली आहे. त्यांनी एकूण १५ एकरमध्ये मिरचीची शेती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते ही शेती करत आहेत. या औषधी मिरचीच्या शेतीसाठी त्यांना बियाणे हे कंपनी पुरवते. शेतकरी या बियाणांची लागवड करतात.

साधारणपणे सोयाबीनची लागवड झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या मिरच्यांची लागवड केली जाते.यामध्ये प्रति एकर ३ ते ४ क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले जाते.यासाठी जवळपास १ ते सव्वा लाख रुपये खर्च येतो. मशागतीपासून, फवारणी, तोडणी यासाठी हा खर्च येतो. जर एक एकरमधून ३ लाखांचा नफा असेल तर १५ एकरमधून ते ४५ लाख रुपये कमावतात.

Success Story
Success Story: विराट कोहलीकडून प्रेरणा, कधीही न हारण्याची जिद्द, पहिल्याच प्रयत्नात तिसरी रँक, वाचा IAS अनन्या रेड्डी यांचा प्रवास

नांदेडमध्ये सध्या औषधी मिरचीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. नांदेडच्या देगांव गावातील शेतकऱ्याने कंपनीसोबत करार करत सुमारे पंधरा एकर क्षेत्रावर या औषधी मिरचीचे उत्पादन घेतलंय. बावीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने ही मिरची खरेदी करण्याचा करार औषधी कंपनीसोबत झालेला आहे.

एकरी पंधरा ते विस क्विंटल इतकं उत्पादन या मिरचीचे निघत असते. त्यातून उत्पादन खर्च काढला तरी प्रति एकर तीन लाखांचा नफा होतो असे या शेतकऱ्यांने सांगितले. औषधी कंपन्यांशी रीतसर करार करून शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला हवे असे या शेतकऱ्यांने सांगितले.

Success Story
Success Story: एकाच कुटुंबात 1 IPS, 3 IAS अन् 5 RAS अधिकारी, कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक करणाऱ्या फराह हुसैन आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com