Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २२ व्या वर्षी IAS झालेले अरुणराज आहेत तरी कोण?

Success Story of IAS Arunraj: आयएएस अरुणराज यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. अरुणराज हे २२ व्या वर्षी आयएएस झाले.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षा देतात. यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पहिल्या प्रयत्नात अनेकांना यश मिळत नाही. परंतु एखादा व्यक्ती पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतो आणि आपले स्वप्न पूर्ण करतो. असंच यश अरुण राज (IAS Arunraj)यांनी मिळवलं आहे. अरुणराज यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

अरुणराज यांनी फक्त सेल्फ स्टडीच्या आधारावर एवढे मोठे यश मिळवले आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; कोणत्याही क्लासशिवाय मिळवली दुसरी रँक; IAS गरिमा लोहिया यांचा प्रवास

शिक्षण (Education)

आयएएस अरुणराज यांनी IIT कानपूरमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी ग्रॅज्युएशनच्या चौथ्या वर्षात यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर फक्त अभ्यास केला. कोणत्याही प्रकारची नोकरी केली नाही.

IAS अरुणराज यांनी पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया रँक ३४ प्राप्त केली. ते २०१५ बॅचचे तमिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी होते.

Success Story
Success Story: इंजिनियरिंग केलं; IAS होण्यासाठी नोकरी अन् MBA सोडलं, एकदा नव्हे दोनदा केली UPSC क्रॅक; आयुषी प्रधान यांचा प्रेरणादायी प्रवास

अरुणराज हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी. त्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून अभ्यास केला. याचसोबत त्यांनी अनेक मॉक इंटरव्ह्यू दिले. त्यांनी वयाच्या फक्त २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) क्रॅक करणाऱ्यांमध्ये खूप कमी आयएएसचा समावेश होतो. यामध्ये आयएएस अरुणराज यांचे नाव येते.

अरुणराज यांनी खूप कमी वयातच आयएएस होण्याचे ठरवले होते. आयएएस (IAS)होण्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत केली. फुल टाइम फक्त अभ्यास केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. ते पहिल्याच प्रयत्नात प्रशासकीय सेवेत IAS म्हणून रुजू झाले. त्यांचा हा प्रवास सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: TRAI मधील नोकरी सोडली; UPSC मध्ये दोनदा अपयश, हार मानली नाही; तिसऱ्या प्रयत्नात केली क्रॅक; IAS सर्जना यादव यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com