Success Story: इंजिनियरिंग केलं; IAS होण्यासाठी नोकरी अन् MBA सोडलं, एकदा नव्हे दोनदा केली UPSC क्रॅक; आयुषी प्रधान यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Ayushi Pradhan: आयुषी प्रधान यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांची सरकारी विभागात निवडदेखील झाली होती. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. रात्रदिवस एक करुन अभ्यास करावा लागतो. तरीही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. कितीही अपयश आले तरीही जी व्यक्ती सतत प्रयत्न करते ती नक्कीच यशस्वी होते. असंच यश आयुषी प्रधान यांना मिळालं.

आयुषी प्रधान या मूळच्या ओडिशाच्या रहिवासी. त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील बँकेत काम करायचे तर आई गृहिणी होती. त्या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी लहानपणीच आपल्याला काय करायचे हे ठरवले होते.

Success Story
Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास, शेवटच्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अपर्णा रमेश यांचा प्रेरणादायी प्रवास

आयुषी प्रधान (Success Story of IAS Ayushi Pradhan) यांनी १०वी पर्यंतचे शिक्षण सेंट एन्स कॉन्वेंट स्कूलमध्ये घेतले. त्यांनंतर त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण मदर्स पब्लिक स्कूलमधून घेतले. त्यांना ९३ टक्के गुण मिळवले. त्यांनी यानंतर कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी प्रायव्हेट जॉब करत एमबीएची तयारी केली.

आयुषी प्रधान यांनी यूपीएससी (UPSC)परीक्षेची तीन अटेंप्ट दिले. त्यांना वयाच्या २६ व्या वर्षी आयएएस ऑफिसर बनल्या. त्यांना पहिल्या प्रयत्नात इंटरव्ह्यू राउंडपर्यंत पोहचल्या होत्या. त्यांना दुसऱ्या अटेंप्टमध्ये ३३४ रँक मिळाली. परंतु त्यांना आयएएस ऑफिसर व्हायचे होते.

आयुषी यांनी २०२३ मध्ये पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली. ही परीक्षा त्यांनी आईडीईएस ट्रेनिंग घेत असताना दिली. त्यावेळी त्यांना ३६ रँक मिळाली. यानंतर त्यांनी आयएएसचे ट्रेनिंग घेतले.

Success Story
Success Story: १०वीत फक्त ४४ टक्के, तब्बल १३ वेळा अपयश, जिद्द सोडली नाही, UPSC क्रॅक केलीच;IAS अवनीश शरण यांचा प्रेरणादायी प्रवास

आयुषी प्रधान यांनी आयएएस होण्यासाठी नोकरी आणि एमबीए मध्येच सोडले होते. त्यांनी घरीच संपूर्ण तयारी केली. त्यांनी घरीच संबंधित विषयातील व्हिडिओज पाहिले. त्यांनी मागील वर्षांचे यूपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. यामुळे त्यांना मदत झाली. त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवले. आयुषी या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांनी लहानपणापासूनच आयएएस व्हायचे ठरवले होते. त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

Success Story
Success Story: IIM मधून MBA, लाखो रुपयांची नोकरी सोडली, दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राच्या लेकीची यशोगाथा वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com