Shruti Kadam
जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा केसकर एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे.
ईशा केसकरने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका काही काळासाठी साकारली होती.
ईशा केसकरचा सरला एक कोटी हा चित्रपट खूप गाजला. त्याव्यतिरिक्त मंगलाष्टक वन्स मोअर, याला जीवन ऐसे नाव, वुई आर ऑन होऊन जाऊ द्या, सी आर डी, हॅलो!!! नंदन या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ईशा केसकर सध्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
ईशा केसकरने आपले शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून पूर्ण केले
तर, ईशा केसकरने महाविद्यालयीन शिक्षण सिम्बायोसिस महाविद्यालयातून पूर्ण केले.
ईशा केसकरने मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे.