खासगी क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल किंवा सरकारी या दोन्ही ठिकाणी उमेदवाराकडून चारित्र्य पडताळणी मागितली जाते. नोकरीसाठी चारित्र्य पडताळणी दाखला बंधनकारक करण्यात आलाय. चारित्र्य पडताळणी दाखल कुठून मिळणार असा प्रश्न पडला असेल तर काळजी नको कारण तुम्हाला हा दाखल ऑनलाईपद्धतीने मिळवता येणार आहे.(Latest News)
अर्जदाराला आता आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत केवळ आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एक फोटो लागतो. त्यानंतर अवघ्या ७ दिवसात पोलीस ठाण्याकडून पडताळणी करून चारित्र्य प्रमाणपत्र दाखला दिला जातो.
अर्जदाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर पोलीस पडताळणी करतात. पोलीस क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिमद्वारे अर्जदारावर काही गुन्हे दाखल आहेत की नाहीत, याची पडताळणी केली जाते. अर्जदाराचा अर्ज पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला जातो. संबंधित व्यक्तीची पुन्हा एकदा तेथून पडताळणी होते. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची किंवा नसल्याची नोंद त्या दाखल्यावर केली जाते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यानंतर तो अर्ज पुन्हा संबंधित पोलीस ठाण्याला पाठविला जातो. अर्जदार एखादा व्यक्ती जिवंत आहे की मृत, याची खात्री करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यातही बोलावून घेतले जाते. त्यानंतर सातव्या दिवसापूर्वीच चारित्र्य पडताळणी दाखला दिला जातो.
आधार कार्ड
मतदान कार्ड
पॅन कार्ड
जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
अर्जदाराचा फोटो
अर्जदाराची स्वाक्षरी
पोलीस अधीक्षकांच्या नावे अर्ज
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आपले सरकार पोर्टल किंवा चारित्र्य पडताळणीच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
नोंदणी करताना आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो (शहरी किंवा ग्रामीण) त्याची निवड करावी.
एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही माहिती भरली आणि फॉर्म सबमिट केला आणि काही चुकीची माहिती त्यात भरली असेल तर ती चूक पुन्हा दुरुस्त करता येत नाही.
नोंदणीनंतर युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
चारित्र्य पडताळणी हा पर्याय निवडल्यानंतर दोन प्रकारचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळतील.
१) सर्वसामान्य चारित्र्य पडताळणी आणि सिक्युरिटी गार्डसाठी
२) परदेशात नोकरीला जाण्यासाठी किंवा इतर कारणासाठी चारित्र्य पडताळणी असे प्रकार आहेत. त्यातील एक पर्याय निवडावा.
फॉर्म किंवा अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ज्या कंपनीत किंवा कार्यालयात जमा करणार आहोत. तेथील कार्यालयाचा किंवा कंपनीचा पत्ता टाकावा.
त्यानंतर आपण कुठे वास्तव्य केले आहे. किती काळ केले आहे त्याची माहिती भरावी.
पुढील पेजवर आपल्यावर गुन्हा झाला असल्यास ‘एस’ किंवा नसल्यास ‘नो’ म्हणावे.
अर्जदार जेवढ्या कालावधीत संबंधित जिल्ह्यात वास्तव्यास आहे, तेवढ्याच कालावधीचा तेथील संबंधित पोलीस ठाण्याकडून चारित्र्य पडताळणी दाखला मिळतो. त्यानंतर सध्या तो जेथे राहायला आहे, त्याठिकाणी अर्ज करून त्या कालावधीतील चारित्र्य पडताळणी दाखला त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच घेऊ शकतो.
ऑनलाइन अर्जासाठी १२३ रुपये शुल्क आहे.
चारित्र्य पडताळणी कशासाठी पाहिजे त्याचे कारण द्यावे लागेल.
एखादी कंपनीला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी दाखला मागते.
पासपोर्ट काढताना अर्जदार व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलिसांकडे केली जाते. किंवा आपल्या नावावर काही गुन्हा दाखल आहे का नाही याची खात्री करण्यासही आपण अर्ज करू शकतो.
सरकारी सेवेत मोठ्या पदावर निवड झालेल्या संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्तीपूर्वी चारित्र्य पडताळणी केली जाते. शासनाच्या वतीने ही पडताळणी होते. यासाठी संबंधित व्यक्तीला ऑफलाईन अर्ज करावा लागतो.
ऑफलाईन पडताळणीची मुदत ३० दिवसांपर्यंत असते. ऑफलाईन पडताळणीत त्या व्यक्तीला स्वत:च्या हस्ताक्षरात अर्ज द्यावा लागतो. दोन साक्षीदाराचे जबाब देखील घेतले जातात.त्या कर्मचाऱ्याची सखोल पडताळणी होऊन पोलिसांकडून हा दाखला दिला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.