Indian Railways: भारतातील 'या' रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, जाणून घ्या का?

Indian Railway Station: भारतातील 'या' रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, जाणून घ्या का?
Indian Railway Stations
Indian Railway Stations Saam Tv
Published On

Indian Railway Station:

भारताचं रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. आपलं रेल्वे नेटवर्क हे जगात चौथं, तर आशियात दुसऱ्या क्रमांकाचं आहे. आपल्या देशात सुमारे 8000 रेल्वे स्थानकं आहेत. यामधील बऱ्याच स्थाकाचं सरकार पुनर्विकास करत आहे.

भारतीय रेल्वे आता आधीपेक्षा अधिक आधुनिक होताना दिसत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेससह अनेक हायस्पीड ट्रेन चालवल्या जात आहेत. या गाड्यांमधून दररोज लाखो भारतीय प्रवास करत आहेत. याच कारण म्हणजे रेल्वेतून जलद आणि अतिशय आरामदायी प्रवास करता येतो. असं असलं तरी तुम्हाला माहित आहे का, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे, जिथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे.

Indian Railway Stations
Pension Scheme: भारी नाही तर जबरदस्त आहे 'ही' योजना, दररोज 7 रुपये जमा करून आयुष्यभर मिळेल 5000 रुपये पेन्शन

व्हिसा लागणारं भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन

देशात एकच रेल्वे स्टेशन आहे, तिथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा आवश्यक गरज आहे. येथे तुम्हाला व्हिसा आणि पासपोर्टशिवाय प्रवेश दिला जात नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे पाकिस्तानी व्हिसा असणे आवश्यक आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव अटारी आहे. हे रेल्वे स्टेशन पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे. तसेच उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर रेल्वे स्थानकाच्या अखत्यारीत येते. (Latest Marathi News)

व्हिसा का आहे आवश्यक?

अटारी रेल्वे स्थानक भारताचा एक भाग आहे, परंतु येथे जाण्यासाठी पाकिस्तानची परवानगी देखील आवश्यक आहे. तुम्ही या रेल्वे स्थानकावर विना व्हिसा घेता फिरताना दिसल्यास तुम्हाला अटक केलं जाऊ शकतं. तसेच तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. व्हिसा आणि पासपोर्टशिवाय आढळल्यास फॉरेन अॅक्ट 14 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.  (Utility News)

Indian Railway Stations
LIC Schemes: LIC च्या 'या' योजनेत फक्त एकदाच जमा करावे लागतील पैसे, आयुष्यभर मिळेल 50,000 रुपये पेन्शन

येथून कोणत्या गाड्या धावतात

जर तुम्हाला या मार्गाने प्रवास करायचा असेल तर तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट तयार करावा लागेल. दिल्ली-अटारी एक्स्प्रेस, अमृतसर-अटारी डेमू, जबलपूर-अटारी स्पेशल ट्रेन्स, समझौता एक्स्प्रेस आणि काही पॅसेंजर ट्रेन्स येथून धावतात. मात्र सध्या हे स्थानक आणि समझौता एक्स्प्रेस दोन्ही बंद आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com