Rent Rule 2023
Rent Rule 2023ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rent Rule 2023: भाडेकरू घराचा ताबा घेऊ शकतो का? जाणून घ्या काय आहेत नियम

Rent Agreement Rule: भाडेकरू घरावर कब्जा करू शकतो का? जाणून घ्या काय आहेत नियम
Published on

Rent Agreement Rule:

घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अनेकदा वाद होत असतात. यातच अनेक घरमालक असे असतात, त्यांना वेळेवर भाडे मिळाले की, ते त्यांच्या घराकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यांना फक्त भाडे हवे असते. यात अशीही काही प्रकरणे आहेत, ज्यात भाडेकरू घर रिकामे करण्यास स्पष्टपणे नकार देतात. अशा परिस्थितीत भाडेकरू सहसा सांगतात की, ते बर्याच काळापासून येथे राहतात. काही तर सरळ नियम आणि कायदे सांगू लागतात आणि घरमालकाला धुडकावून लावतात.

जर तुम्ही भाडेकरू किंवा घरमालक असाल तर तुम्हाला हा नियम माहित असणे कर्जेच आहे की, जर कोणी घरात 10 वर्षांपासून राहत असेल तर घरमालक त्याला घर रिकामे करण्यास सांगू शकतो की नाही? भाडेकरूंनी घर सोडले नाही तर तुम्ही काय कारवाई करू शकता? त्याबद्दल जाणून घेऊ.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rent Rule 2023
Explainer: अदानींच्या संपत्तीत गेल्या 8 दिवसात आश्चर्यकारक वाढ, यामागचं नेमकं कारण काय?

काय आहे लिमिटेशन अॅक्ट 1963?

लिमिटेशन अॅक्ट 1963 मध्ये भाडेकरू आणि घरमालक यासंबंधीच्या नियमांचा उल्लेख आहे. या कायद्यानुसार, खाजगी मालमत्तेवरील मर्यादेचा वैधानिक कालावधी 12 वर्षे आहे. या कालावधीला ताब्याचा दिवस म्हणतात, त्यानुसार निर्णय भाडेकरूच्या बाजूने लागू शकतो. (Latest Marathi News)

भाडेकरू घेऊ शकतात घराचा ताबा

छोट्याशा निष्काळजीपणामुळे जमीन मालकाचे घर भाडेकरू ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे भाडेतत्वावर घर देण्यासोबतच भाडेकरूकडून भाडेकरारावर स्वाक्षरी करून घेणे आवश्यक आहे, याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. घर, दुकान किंवा कोणतीही जमीन भाड्याने द्यायची असेल तरमी, आधी भाडे करार तयार करा.

हा करार 11 महिन्यांसाठी करावा, ज्याचे तुम्हाला दर 11 महिन्यांनी नूतनीकरण करावे लागेल. असे केल्याने तुमच्या घराचा ताबा कोणीही घेऊ शकत नाही. याशिवाय, तुम्ही तुमची मालमत्ता कोणालातरी भाड्याने दिली आहे, याचाही हा पुरावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com