IT Jobs Vacancy: खूशखबर! या क्षेत्रात ५० हजार रोजगाराच्या संधी, तब्बल इतक्या कंपन्यांना मिळाली मंजुरी

IT Jobs Vacancy: आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. या क्षेत्रात येणाऱ्या काळात प्रत्यक्ष ५० हजार तर अप्रत्यक्ष १.५० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
IT Jobs Vacancy
IT Jobs VacancySaam Digital
Published On

IT Jobs Vacancy

आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. या क्षेत्रात येणाऱ्या काळात प्रत्यक्ष ५० हजार तर अप्रत्यक्ष १.५० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रीतील दिग्गज डेल, एचपी, लिनोवो, फॉक्सकॉन सारख्या २७ कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत मंजुरी मिळाली मिळाली आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या ९५ टक्के कंपन्या पहिल्या दिवसांपासून उत्पादन सुरू करणार आहेत. जवळपास २३ कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. तर उर्वरित चार कंपन्या येत्या तीन महिन्यांमध्ये या योजनेंतर्गत उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील २७ कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यातून ५० हजार रोजगार निर्माण होतील. तर अप्रत्यक्षपणे १.५० लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत. आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यात डेल, फॉक्सकॉन, लिनोवो, फ्लेक्सट्रॉनिक्स, पेजेट, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे.

IT Jobs Vacancy
Vishwakarma Yojana: गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना, मिळेल 3 लाखांचं कर्ज, असा करा अर्ज

विशेष म्हणजे, देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने २.० प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना सुरू केली आहे. आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या नवीन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यासाठी करकार १७ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

IT Jobs Vacancy
Gold Silver Rate Today (18th November): सोन्याच्या दरात घसरण, चांदीची चकाकीही उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com