New Sim Card Rules : सिम कार्डची प्रोसेस आता Digital स्वरुपात! नव्या वर्षात लागू होणार नवे नियम; वाचा सविस्तर

Sim Card Buying Rules : येत्या वर्षापासून सिम कार्ड खरेदीवर फक्त डिजिटल केवायसी असेल. आतापर्यंत सिम खरेदी करण्यासाठी कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत होती परंतु, यामध्ये ग्राहकांचा अधिक वेळ वाया जात होत होता. दूरसंचार विभागाने (DoT)याविषयी निर्देश जारी केले आहेत.
New Sim Card Rules
New Sim Card Rules Saam Tv
Published On

New Kyc Rules For Sim Card :

नवीन वर्ष सुरु होताना अनेक गोष्टी बदलतात. अनेक शैक्षणिक आणि आर्थिक नियम बदलतात. अशातच १ जानेवारीपासून केवळ वर्षच नाही तर सिमकार्ड खरेदीचा नियमात बदल होणार आहे.

येत्या वर्षापासून सिम कार्ड खरेदीवर फक्त डिजिटल केवायसी असेल. आतापर्यंत सिम खरेदी करण्यासाठी कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत होती परंतु, यामध्ये ग्राहकांचा अधिक वेळ वाया जात होत होता. दूरसंचार विभागाने (DoT)याविषयी निर्देश जारी केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ जानेवारीनंतर नवीन सिम खरेदी करताना, कस्टमरला फक्त ई-केवायसी करावे लागेल. या ई-केवायसीचा उद्देश युजर्सची फसवणूक होऊ नये इतकाच असतो. तसेच नवीन नियमानंतर डॉक्युमेट्वर आधारित केवायसी रद्द केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांचा (Company) खर्चही (Price) कमी होईल असे मत मांडण्यात आले.

New Sim Card Rules
Financial Deadline In December : 31 डिसेंबरपूर्वी ही महत्त्वाची ७ कामे पूर्ण करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

1. निर्णयाची अंमलबजावणी करण्यास उशीर

सरकारने ऑगस्टमध्ये नवीन नियम (Rules) जाहीर केले होते, मात्र या नियमाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. इतकेच नाही तर नवीन नियमांनुसार सिमकार्ड विक्रेत्यांची पडताळणीही केली जाणार आहे.

2. सायबर फसवणूकीला आळा

सध्या फ्रॉर्डच्या घटना अधिक प्रमाणात होताना दिसून येतं आहे. यासाठी सरकारला सायबर फ्रॉर्ड आणि सिम स्वॅपिंगसारख्या प्रकरणांना आळा घालायता आहे. सरकारने सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित ७० लाख मोबाइल नंबर ब्लॉक करण्यात आले.

New Sim Card Rules
Weight Loss Breakfast : हिवाळ्यात सतत भूक लागते? ट्राय करा नाचणी-ओट्सचा ढोकळा, वाढते वजनही राहिल नियंत्रणात

तसेच नवीन नियमानुसार सरकारने टेलिकॉम कंपन्यांसाठी फ्रँचायझी, वितरक आणि पॉइंट-ऑफ-सेल (PoS)एजंट्सची नोंदणी देखील करण्यात येईल. यासाठी टेलिकॉम डीलर्स आणि एजंटना वर्षभराचा वेळ देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com