कोमल दामुद्रे
हिवाळ्यात आपल्याला सारखी भूक लागते परंतु, वजन वाढेल या भीतीने आपण कमी खाण्याचे ट्राय करतो.
तुम्ही आहारात नाचणी -ओट्सचा समावेश केल्यास वाढते वजनही नियंत्रणात राहिल आणि भूकही लागणार नाही.
१ वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी ओट्सचे पीठ, अर्धी वाटी उडीद डाळीचे पीठ, १/३ वाटी दही, मीठ, लाल-तिखट, बेकिंग सोडा, तेल, हिरवी मिरची, बारिक चिरलेला कोथिंबीर
नाचणी आणि ओट्सचे पीठ मिक्स करा. त्यात उडीद डाळ पावडर आणि दही मिसळून बॅटर तयार करुन घ्या.
हे पीठ रात्रभर किंवा ६ते८ तास आंबवण्यासाठी ठेवा.
त्यानंतर पीठ चांगले फेटून घ्या. त्यात मीठ, जिरे, तिखट, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आले टाका.
स्टीमरमध्ये पाणी गरम करा. तयार केलेल्या पिठात एक चतुर्थांश चमचा एनो पावडर घाला आणि मिक्स करा.
तेलाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये पीठ टाका आणि शिजवण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासानंतर तपासा आणि शिजले नसेल तर अजून थोडा वेळ शिजवा.
थंड झाल्यावर त्याचे आकार कापून ढोकळ्याला फोडणी द्या. त्यात मोहरी, तिखट, कढीपत्ता आणि लिंबाचा रस मिसळा.तयार आहे नाचणी-ओट्सचा ढोकळा.