कोमल दामुद्रे
मुंबईतील अनेक स्ट्रीटवर चमचमीत पदार्थांची चव चाखयाला मिळते.
वडा पाव, मिसळ पाव, पाव भाजी, पाणी पुरी, शेव पुरी हे पदार्थ मुंबईची शान म्हणून ओळखले जातात.
मुंबईतील कोणत्या ठिकाणी सगळ्यात फेमस पाव भाजी कुठे मिळते पाहूया.
सीएसटी स्टेशनसमोर असणारं कॅनन पावभाजीचं दुकान गेल्या कित्येक वर्षापासून प्रसिद्ध आहे. १०० रुपयात या पावभाजीची चव चाखता येते.
दक्षिण मुंबईतील सगळ्यात फेमस पावभाजी सेंटर सरदार पावभाजी म्हणून ओळखले जाते. यामध्ये भरभरुन बटरचा वापर केला जातो. ११० रुपयांपासून येथे पावभाजीची चव चाखता येते.
मरिना मेन्शन, एसव्हीपी रोड, चौपाटी, गिरगाव या ठिकाणी १०० रुपयांपासून पावभाजीची चव चाखयला मिळते.
गिरगाव चौपाटीला १०० रुपयांपासून पावभाजी मिळते. या ठिकाणी तुम्हाला झणझणीत आणि मसालेदार पावभाजीची चव चाखता येते.