कोमल दामुद्रे
महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि डोंगरांमधून वाहणारे धबधबे अनेक पर्यटकांना आकर्षित करतात.
पुण्यातील जुन्नर तालुक्यात नाणेघाट हा उलटा धबधबा वाहातो.
हा धबधबा घाटाच्या उंचीवरुन खाली येण्याऐवजी वर येतो.
नाणे घाटातील धबधब्याचं पाणीही खाली पडते परंतु, हवेचा मोठा दाब असल्यामुळे पुन्हा वर येते.
नाणेघाट हा पुण्यापासून साधारण ९० किमी अंतरावर आहे.
या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात उलटा वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेघाट धबधबा पाहायला मिळतो.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या धबधब्याचे रुप पर्यटकांना भूरळ घालते.