सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSC मध्ये भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकता.
MPSC तर्फे पुन्हा एकदा ८०० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही १२ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. याबाबतची माहिती एमपीएससीचीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विभागांतील विविध संवर्गातील ८४२ पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी असेल, अर्ज (Application) कसा कराल जाणून घेऊया.
1. रिक्त जागा किती?
वैद्यकीय (Medicial) शिक्षण व औषधी द्रव्ये- ७७४
गृह विभाग- १०
उच्च व तंत्रशिक्षण विभाग- १
सामान्य प्रशासन विभाग- १
इतर मागास बहुजन कल्याण विभाग- ५७
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग- ३
2. अर्ज कसा कराल?
इच्छुक विद्यार्थ्यांनी https://mpsc.gov.in या वेबसाइटवर (Website) भेट देऊन अर्ज करु शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १ जानेवारी असेल. या पदांमध्ये गट अ, गट ब मधील पदांचा समावेश आहे.
3. शिक्षण मर्यादा
पदरभरतीच्या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, निवडीची साधारण प्रक्रिया, अभ्याक्रमाची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.