Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Google Pixel 10 Launch Date: गुगल पिक्सेल १० च्या लाँचिंगची तारीख अधिकृतपणे जाहीर झाली आहे. पिक्सेल १० चे फीचर्स काय असतील, कॅमेरा अपग्रेड, स्टोरेज काय असेल हे जाणून घ्या.
Google Pixel 10 Launch Date
Google Pixel 10 smartphone set to launch soon with stunning features and advanced performancesaam tv
Published On
Summary
  • गुगल पिक्सेल 10 च्या लॉन्च तारखेची घोषणा झाली

  • फोनमध्ये भन्नाट कॅमेरा आणि दमदार बॅटरी मिळणार

  • मोठं स्टोरेज आणि फास्ट प्रोसेसर ही वैशिष्ट्यं असणार

  • भारतातही हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे

तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस थांबा, कारण गुगल एक नवीन फोन लॉन्च करणार आहे. गुगलने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, नवीन पिक्सेल १० सीरिज २० ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या Made by Google कार्यक्रमात लाँन्च केला जाणार आहे. या बहुप्रतिक्षित स्मार्टफोन लाइनअपमध्ये यावेळी अनेक मोठे बदल दिसू शकतात.

जर लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, यावेळी गुगल Pixel 10, Pixel 10 XL, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold बाजारात लाँन्च केले जातील अशी शकता आहे. डिझाइनमध्ये मोठा बदल होणार नसून ते मागील मॉडेल्ससारखेच राहणार आहे.

कॅमेऱ्यातील सर्वात मोठा बदल

मात्र कॅमेऱ्यात सर्वात मोठा अपग्रेड केला जाणार आहे. बेस मॉडेल पिक्सेल १० मध्ये आता ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. त्यात टेलिफोटो लेन्स देखील असेल, जो पूर्वी फक्त प्रो मॉडेल्समध्ये दिला जात होता. अहवालांनुसार, त्याचा प्राथमिक सेन्सर पिक्सेल ९ पेक्षा थोडा लहान असेल, जो कमी प्रकाशात कामगिरीवर परिणाम करू शकतो. त्याचवेळी, पिक्सेल 10 प्रो आणि प्रो एक्सएलमध्ये मागील प्रो मॉडेल्समध्ये असलेली कॅमेरा सिस्टम असणार आहे.

Google Pixel 10 Launch Date
Smartphones: जबरदस्त कॅमेरा अन् दमदार स्टोरेज; 40 हजाराच्या आतमधील शानदार 5G मोबाईल फोन

स्मार्ट फोटोग्राफीसह एआय फीचर्स

गुगल यावेळी अनेक नवीन एआय टूल्स देखील आणत आहे. यामध्ये स्पीक-टू-ट्वीक (व्हॉइससह फोटो एडिटिंग), स्केच-टू-इमेज (ड्रॉइंगमधून फोटो तयार करणे) आणि नवीन पिक्सेल सेन्स व्हर्च्युअल असिस्टंट यांचा समावेश असेल. कॅमेरा कोच नावाचे एक फीचर्स देखील असेल, जे तुम्हाला फोटो क्लिक करताना योग्य अँगल आणि लायटिंग बाबत मार्गदर्शन करेल.

Google Pixel 10 Launch Date
वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

कंपनी पिक्सेल १० सीरिजमध्ये आपला नवीन Tensor G5चिपसेट वापरेल. तो आता सॅमसंगऐवजी टीएसएमसी द्वारे बनवण्यात येणार आहे. ३एनएम प्रक्रियेवर तयार केला जाईल. यामुळे फोनची कार्यक्षमता आणि उष्णता व्यवस्थापन दोन्ही सुधारेल. रिपोर्ट्सनुसार, यावेळी फोन थोडा मोठा आणि वजनदार असेल. जो कदाचित मोठी बॅटरी आणि नवीन Qi2 मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्टमुळे असू शकतो. हे फीचर आधी पिक्सेल सीरिजमध्ये उपलब्ध नव्हते. या फोनची खास गोष्ट म्हणजे पिक्सेल १० प्रो फोल्ड हा जगातील पहिला धूळ-प्रतिरोधक (IP68) फोल्डेबल फोन असणार आहे.

याचा अर्थ असा की धूळ फोनमध्ये प्रवेश करू शकणार नाही. हा फोन रंग प्रकारांमध्येही बदल दिसेल. पिक्सेल १० मध्ये इंडिगो, फ्रॉस्ट आणि लिमोन्सेलो सारखे नवीन रंग असणार आहेत. तर प्रो मॉडेल्समध्ये पोर्सिलेन, जेड आणि मूनस्टोन सारखे शेड्स असतील. पिक्सेल १० मालिकेत, गुगलने कॅमेरा, एआय फीचर्स, बॅटरी आणि वायरलेस चार्जिंगवर लक्ष केंद्रित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com