Smartphones: जबरदस्त कॅमेरा अन् दमदार स्टोरेज; 40 हजाराच्या आतमधील शानदार 5G मोबाईल फोन

Top 5G Smartphones : तुम्ही नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात आहात का? काय तुमचा बजेट ४०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीचा आहे का? भारतातील उत्कृष्ट कॅमेरे, प्रचंड स्टोरेज आणि दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देणाऱ्या फोनची यादी येथे दिलीय.
Top 5G Smartphones
Top 5G smartphones under ₹40,000 – stylish design, great cameras, and massive storage options.saam tv
Published On
Summary
  • ४० हजार रुपयांच्या आत प्रीमियम फिचर्स असलेले 5G मोबाईल्स उपलब्ध

  • जबरदस्त कॅमेरा आणि अधिक स्टोरेज क्षमता ही मोबाईल्सची खासियत

  • गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी हाय-परफॉर्मन्स प्रोसेसर

  • सॅमसंग, वनप्लस, शाओमीसह टॉप ब्रँड्सचे पर्याय

विवोने त्यांच्या नवीनतम 5G स्मार्टफोन Vivo V60 5G सह मिड-रेंज सेगमेंटमध्ये आणखी एक उत्तम मोबाईल बाजारात आणलाय. प्रीमियम डिझाइन, शानदार कॅमेरा सेटअप आणि जबरदस्त परफॉरमन्स देणारा फोन लॉन्च केलाय. पण वाचक मित्रांनो तुम्हाला असेच फीचर्स असलेला फोन दुसऱ्या कंपनीमध्ये शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

मार्केटमध्ये OnePlus, iQOO, Realme आणि Samsung सारखे फोन्स उपलब्ध आहेत. या फोन्सचे फीचर्स कमाल आहेत. विवोने भारतात त्यांच्या V सीरिजमधील एक नवीन फोन लाँन्च केला आहे. याला V60 म्हणून ओळखले जाते. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून हा कॅमेरा Zeiss ब्रँडचा आहे. यात AI-इमेजिंग आणि उत्पादकता साधने देखील आहेत, जी या डिव्हाइसला खास बनवतात.

या फोनमध्ये 6500mAhmAh बॅटरी आणि 7 व्या जनरेशन 4 चिपसेट आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 36,999 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. या फोनच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. V60 चा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला फोन 40,999 रुपयांमध्ये मिळतो.

Top 5G Smartphones
RBI Cheque: दोन दिवस नाही तर काही तासात क्लिअर होईल Cheque; आरबीआय आणणार नवीन यंत्रणा

OnePlus Nord 5- वनप्लसची किंमत 31,999 रुपये आहे. या फोनमध्ये कॅमेरा स्नॅपड्रॅगन 8s जेनरेशन 3 आहे. या फोनचा डिस्प्ले साइज 6.83 आहे.

Oppo Reno14 - ओप्पोचा हा फोन त्यांच्या नवीन फ्लॅगशिप Oppo Reno 14 5G Series चा फोन आहे. हा फोन चीन आणि मलेशियामध्ये पसंतीस उतरला होता. या फोनची किंमत 37,999 आहे. हा फोन 6.83 इंच असून यात 1.5K OLED डिस्प्ले देण्यात आलाय. मॅट फिनिशसह स्लीक बॉडीमध्ये डिझाइन केलेला हा फोन क्रिस्टल शील्ड ग्लास प्रोटेक्शनसह येतो.

Top 5G Smartphones
Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

OnePlus 13R- हा फोन कंपनीचा प्रीमियम मोबाईल फोन आहे. 5जी असलेल्या या फोनची सीरिज परवडणाऱ्या किमतीत मिळणारे आहेत. हा फोन 6.7 इंचाचा आहे. यात 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. या फोनची किंमत 38,855 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Realme GT 6- हा फोन तुम्हाला फक्त 30,000 हजाराच्या किमतीत मिळेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s जनरेशन 3 SoC सह हा फोन येईल. या Realme फोनमध्ये तुम्हाला 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com