
आरबीआय ४ ऑक्टोबर २०२५ पासून नवीन चेक क्लिअरिंग प्रणाली सुरू करणार.
चेक अवघ्या काही तासांत क्लिअर होणार.
सध्याची बॅच प्रक्रिया काढून टाकून सतत क्लिअरिंग पद्धत लागू होणार.
ग्राहकांच्या व्यवहारांचा वेग वाढणार आणि बँकिंग सेवा सुधारतील.
आपल्यातील अनेकजण बँकेत चेक म्हणजे धनादेश देऊन पैशांचा व्यवहार करत असतात. धनादेश व्यवहार करण्यासाठी साधरण दोन दिवस लागतात. आता बँकेत चेक वटवणं सोपं होणार असून अवघ्या काही तासात व्यवहार पूर्ण होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ४ ऑक्टोबर २०२५ पासून चेक क्लिअरिंगची एक नवीन प्रणाली सुरू करणार आहे. यात तुमचा चेक काही तासांत क्लिअर होईल.
सध्याची चेक ट्रंकेशन सिस्टीम आणि बॅच प्रक्रिया काढून टाकून "सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट ऑन रीअलायझेशन" ने बदलली जाणार असल्याचं आरबीआयने सांगितलंय. चेक बँकेत जमा होताच, त्याची स्कॅन केलेली प्रत ताबडतोब क्लिअरिंग हाऊसला पाठवली जाईल. त्यानंतर पैसे देणाऱ्या बँकेला पाठवली जाईल. तिथून बँकेला निर्धारित वेळेत चेक मंजूर करावा लागेल किंवा नाकारावा लागेल, असं आरबीआयनं सांगितलंय.
यामुळे बँकेत चेक क्लिअरन्ससाठी लागणारा वेळ दोन दिवसांवरून फक्त काही तासांपर्यंत कमी होईल. चेक क्लिअरिंग सिस्टमला गती देण्यासाठी बँकेने ही प्रणाली आणलीय. ही नवीन प्रणाली दोन टप्प्यात लागू केली जाईल. पहिला टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ पर्यंत असेल. यात चेक मिळाल्यानंतर बँकेने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कन्फर्मेशन देणे आवश्यक आहे.
जर बँकेने कन्फर्मेशन दिले नाही तर चेक आपोआप स्वीकारला गेला असे मानले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात ३ जानेवारी २०२६ पासून, बँकेला चेक मिळाल्यापासून फक्त ३ तासांच्या आत तो क्लिअर करावा लागेल. उदाहरणार्थ, जर चेक सकाळी १० ते ११ च्या दरम्यान जमा केला गेला तर तो दुपारी २ वाजेपर्यंत मंजूर किंवा नाकारावा लागेल.
सर्व बँकांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत चेक प्रेझेंटेशन सत्र असेल, ज्यामध्ये चेक सतत स्कॅन करून पाठवले जातील. पुष्टीकरण सत्र सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत चालेल. पहिल्या टप्प्यात, कामाची समाप्ती वेळ" संध्याकाळी ७ वाजता असेल, तर दुसऱ्या टप्प्यात तो फक्त ३ तासांपर्यंत कमी केला जाईल.
दरम्यान या बदलानंतर, ग्राहकांना पैसे मिळविण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. सेटलमेंटनंतर बँकेला जास्तीत जास्त १ तासाच्या आत ग्राहकांच्या खात्यात पैसे टाकावे लागतील. यामुळे चेक क्लिअरिंगमध्ये लागणारा वेळ कमी होईल आणि तुमचे पैसे लवकर उपलब्ध होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.