Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

SBI IMPS Transaction Charges: हे बदल ऑनलाइन आणि शाखा चॅनेलसाठी स्वतंत्रपणे लागू होतील. ऑनलाइन युझर्ससाठी २५,००० रुपयांपर्यंतच्या लहान मूल्याचे IMPS व्यवहार मोफत राहणार आहेत.
Bank Charges
SBI IMPS Transaction Chargessaamtv
Published On
Summary
  • SBI १५ ऑगस्ट २०२५ पासून IMPS ऑनलाइन ट्रान्सफरवर शुल्क आकारणार.

  • आधी ही सेवा पूर्णपणे मोफत होती.

  • IMPS द्वारे प्रति व्यवहार ५ लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी IMPS व्यवहार शुल्कात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. बँक आता तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) व्यवहारांशी संबंधित शुल्कांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. आता बँकेच्या ग्राहकांना १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन IMPS ट्रान्सफरवर शुल्क भरावे लागणार आहे. हे आधी पूर्णपणे मोफत होते.

IMPS म्हणजेच इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिस. ही रिअल-टाइम फंड ट्रान्सफर सिस्टम आहे. याच्या मदतीने कोणतीही व्यक्ती त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. ही सेवा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे प्रदान केली जाते. IMPS वर प्रति व्यवहार मर्यादा ५ लाख रुपये आहे.

Bank Charges
Bank Rules: मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशाचं काय होतं? RBI ने जारी केले नवीन नियम

हे बदल ऑनलाइन आणि शाखा चॅनेलवर स्वतंत्रपणे लागू होतील, काही स्लॅबमध्ये नवीन शुल्क असेल तर काही अपरिवर्तित राहतील. यात २५,००० रुपयांपर्यंतचे कमी मुल्याचे आयएमपीएस व्यवहार ऑनलाइन युझर्ससाठी मोफत राहतील. तर ऑनलाइन माध्यमातून केलेल्या २५,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या व्यवहारांवर १५ ऑगस्ट २०२५ पासून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.

Bank Charges
Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पगार खातेधारकांना ऑनलाइन आयएमपीएस हस्तांतरणावर पूर्ण सूट मिळत राहील. SBI ने केलेला बदल फक्त ऑनलाइन व्यवहारांवर लागू असणार आहे. तर काही स्लॅबमध्ये नाममात्र शुल्क आकारले जाईल. काही खात्यांवर हे शुल्क अजूनही आकारले जाणार नाहीत. जर तुम्ही इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI सारख्या ऑनलाइन माध्यमातून IMPS करत असाल तर आता तुम्हाला शुल्क भरावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com