Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Whats app Web : भारताच्या आयटी मंत्रालयाने (MeitY) कर्मचाऱ्यांना वैयक्तिक डेटाचे संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी सूचना दिलीय. ऑफिस लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरणे बंद करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आलीय.
Whats app Web
overnment warns against using WhatsApp Web on office laptops due to personal data security risks saam tv
Published On
Summary
  • ऑफिस लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरणं धोकादायक ठरू शकतं.

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सूचना जारी केली.

  • वैयक्तिक डेटा कंपनीकडे जाण्याचा धोका वाढतो.

  • सुरक्षिततेसाठी व्हॉट्सअॅप वेब फक्त खाजगी डिव्हाइसवर वापरण्याचा सल्ला.

तुम्ही ऑफिसच्या डेकस्टॉप किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरतात का? तर सावध व्हा. ऑफिसच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेब चालवणं धोक्याचं बनू शकतं. जर तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरण्याची सवय असेल, तर तुमची ही सवय बदला. भारत सरकारच्या MeitY (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) ने एक मार्गदर्शक सूचना दिलीय. सरकारने लोकांना ऑफिसच्या लॅपटॉप आणि डेकस्टॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरणे थांबवण्याची विनंती केलीय.

सरकारने अशी सूचना देण्यामागे एक धक्कादायक कारण आहे. जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही ऑफिसच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वापरणं लगेच बंद कराल. ऑफिस लॅपटॉपवर वैयक्तिक चॅट्स आणि फाइल्समध्ये अॅक्सेस करणे सोपं होतं असतं. पण असं केल्याने तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या कंपनीतील लोकांना मिळू शकते.

या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असा इशारा देण्यात आला आहे की व्हॉट्सअॅप वेब वापरल्याने तुमच्या लॅपटॉपच्या अॅडमिनिस्ट्रेटर आणि आयटी टीमला तुमच्या खासगी गोष्टी किंवा चर्चा आणि वैयक्तिक फाइल्सचा अॅक्सेस मिळू शकतो. हे मॅलवेअर, स्क्रीन-मॉनिटरिंग सॉफ्टवेअर किंवा ब्राउझर हायजॅकिंगसह अनेक प्रकारे होऊ शकते.

Whats app Web
Spam Calls: स्पॅम कॉलच्या ट्रिंग ट्रिंगला वैतागलात? 'या' सोप्या ट्रिक्सनं दूर होईल कटकट

कामाच्या ठिकाणी वाढत्या सायबरसुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा इशारा दिलाय. कारण सरकारच्या माहिती सुरक्षा जागरूकता पथकाने कॉर्पोरेट उपकरणांवर मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या वापरण्याशी संबंधित धोके काय आहेत याची सूचना केलीय. ऑफिस वाय-फाय वापरल्याने कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या फोनवर काही प्रमाणात अॅक्सेस मिळू शकतो, ज्यामुळे तुमचा खासगी डेटा धोक्यात येऊ शकतो.

जर तुम्हाला व्हॉट्सअॅप वेब वापरणे आवश्यक असेल, तर सरकारने काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅप वेब वापरल्यानंतर, लॉग आउट करा.एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून लिंकवर क्लिक करताना किंवा अटॅचमेंट उघडताना काळजी घ्या.

Whats app Web
Agriculture Scheme: शेतात सिंचन व्यवस्था करायचीय? मग तयार करा शेततळं; सरकार देणार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Q

सरकारने व्हॉट्सअॅप वेबबाबत कोणती सूचना दिली आहे?

A

सरकारने ऑफिसच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरणे थांबवण्याची सूचना दिली आहे.

Q

ही सूचना कोणत्या मंत्रालयाने दिली आहे?

A

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) ने ही सूचना दिली आहे.

Q

धोका नेमका काय आहे?

A

ऑफिस लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरल्यास तुमची वैयक्तिक माहिती कंपनीतील लोकांना मिळू शकते.

Q

हा धोका कसा टाळता येईल?

A

वैयक्तिक व्हॉट्सअॅप वेब केवळ खाजगी डिव्हाइसवर वापरणे आणि कामाच्या संगणकावर टाळणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com