
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेततळ्याला अनुदान
प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% किंवा २ लाखांपर्यंत आर्थिक मदत
अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना प्राधान्य
वर्षभर सिंचनामुळे पिकांचे नुकसान होणार नाही
राज्यातील बहुतांश शेतकरी आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न मर्यादित राहत. ही बाब लक्षात घेत सरकार मागेल त्याला शेततळं योजना राबवत आहे. या योजनेसह सरकार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना भरघोस अनुदान देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत राज्य सरकार शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान देणार आहे.
शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% किंवा जास्तीत जास्त २ लाखांपर्यंत आर्थिक मदत सरकार करेल. मागेल त्याला शेततळे या योजनेसह इतर योजनेंतर्गत बांधलेल्या किंवा स्वखर्चाने तयार केलेल्या शेततळ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान या योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाणार आहे. शेततळ्यामुळे वर्षभर शेतीसाठी सिंचन करता येणार आहे. कोरड्या हंगामातही पिकांना पाणीपुरवठा करता येणार आहे. सतत मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही.
अर्ज करणारा शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
जर अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य असेल.
शेतकऱ्याकडे ०.४० ते ६ हेक्टर दरम्यान शेतजमीन असणे आवश्यक.
दुर्गम भागातील शेतकरी असेल आणि त्याच्याकडे०.४० हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तरी योजनेसाठी अर्ज करता येईल.
एकदा लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे पुन्हा लाभ मिळणार नाही.
शेतकरी ओळख प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
शेतकऱ्याचा फोटो
शेतजमिनीचा नकाशा
स्वयंघोषणा पत्र
राज्य सरकारने महाडीबीटी योजनांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केलीय. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकर https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळाला भेट तेथे अर्ज करावा. तसेच योजनेबाबत अधिक माहिती हवी असेल तर आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, तालुक्याच्या पंचायत समितीतील कृषी विभाग किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधावा.
सरकार कोणत्या योजनेअंतर्गत शेततळ्याला अनुदान देत आहे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत.
शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान मिळणार आहे?
प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% किंवा जास्तीत जास्त २ लाख रुपये.
कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य आहे?
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकरी.
या योजनेचा मुख्य फायदा काय आहे?
वर्षभर शेतीसाठी सिंचनाची सोय होऊन पिकांचे नुकसान टाळता येईल.
अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.