Agriculture Scheme: जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी सरकार करेल मदत; कसा कराल अर्ज, काय आहे पात्रता?

Birsa Munda Krishi Kranti Yojana: शेतातील पिकांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विहिरीच्या दुरुस्ती सरकार आर्थिक मदत करते. तुम्हाला आर्थिक मदत हवी तर तुम्हाला अर्ज करावा लागेल.
Birsa Munda Krishi Kranti Yojana
Farmers can get up to ₹1 lakh for well repairs under the Birsa Munda Krishi Kranti Yojanasaam tv
Published On
Summary
  • सरकारकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते. विहीरीच्या दुरुस्तीकरिता अनुदान दिलं जाते.

  • ही योजना अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी आहे.

  • योजनेत १ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत असते.

  • अर्ज करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा लागतो.

राज्य सरकारकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येते. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील शेकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाते. या योजनेच्या मार्फत सरकार शेतकऱ्यांना १००% अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळीसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाईपसाठी आर्थिक मदत पुरवत असते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहीर दुरुस्तीसाठी सुद्धा १ लाखांपर्यंत अनुदान दिले जातं. (Government To Help Farmers Repair Old Wells Under Agricultural Scheme)

योजनेतून ०.४० ते ६.०० हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून दिली जाते. यासह परसबागेमध्ये घराभोवती भाजीपाला पीक घ्यायचे असेल तरीही सरकार मदत करते. परवानाधारक बियाणे विक्रेत्यांकडून जास्तीत जास्त ५०० रुपयांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. दरम्यान या सर्व योजनांचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असावीत.

विहिरीची दुरुस्ती करायची असेल तर काय आहे पात्रता

( who is eligible for Birsa Munda Krishi Kranti Yojana?)

योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असला पाहिजे.

अर्जदाराकडे आधारकार्ड, बँक खाते असणे आवश्यक. बँक खात्याशी आधारकार्ड लिंक असणं गरजेचे आहे.

अर्जदाराच्या नावे ७/१२ दाखला व ८अ उतारा असावा.

शेतकरी ओळखपत्र आवश्यक दरम्यान राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केलंय.

महाडीबीटीच्या योजनांसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य ही पद्धत लागू केलीय.

जात प्रमाणपत्र असले पाहिजे.

दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डधारक पाहिजे.

शेतकऱ्याकडे लाभार्थीकडे किमान ०.४० हेक्टर आणि कमाल ६ हेक्टर शेत जमीन असली पाहिजे.

अर्ज कसा कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.

नियम काय आहेत? ( What Are Rules For Birsa Munda Krishi Kranti Yojana?)

७/१२ उताऱ्यावर विहिरीची नोंद असणे अनिवार्य

जर नवीन विहिरीसाठी अनुदान घेतले असेल तर त्या शेतकऱ्यांना जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी २० वर्षांनंतरच अनुदान मिळू शकते.

विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू करत असाल तर त्याआधी विहिरीचा एक फोटो घ्या. विहिरीजवळ काहीतरी खूण दिसली पाहिजे.

शेतकऱ्यानं १०० किंवा ५०० च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहिले असावं.

गट विकास अधिकाऱ्यांची शिफारसपत्र आवश्यक

Q

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना म्हणजे काय?

A

ही योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी आहे. या अंतर्गत विहीर दुरुस्ती, बोअरिंग, शेततळं आणि सिंचनासाठी अनुदान दिलं जातं.

Q

जुनी विहीर दुरुस्तीसाठी किती अनुदान मिळते?

A

शेतकऱ्याला १ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते.

Q

कोण पात्र आहेत?

A

अनुसूचित जमातीतील शेतकरी, ज्यांचं नाव 7/12 उताऱ्यावर आहे आणि त्यांच्याकडे शेतजमीन आहे.

Q

अर्ज कसा करावा?

A

कृषी विभागाच्या वेबसाइटवर किंवा जवळच्या कृषी कार्यालयात अर्ज करता येतो. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com