Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ९ ते ५ नोकरी, रात्रभर अभ्यास; आधी BPSC अन् नंतर UPSC क्रॅक; IAS श्वेता भारती यांची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Shweta Bharti: श्वेता भारती यांनी नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास करत स्पर्धा परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कष्टाला पर्याय नाही, असं म्हणतात. असंच काहीसं आयएएस श्वेता भारती यांच्यासोबत झालं आहे. श्वेता भारती यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय BPSC आणि UPSC परीक्षा पास केला. त्यांनी खूप कष्टाने ही परीक्षा पास केली आहे.

श्वेता भारती या मूळच्या बिहारच्या रहिवासी आहे. त्यांची सध्या बिहार कॅडरमध्ये पोस्टिंग आहे. त्यांनी नोकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला अन् यश मिळवले. (Success Story)

श्वेता भारती यांनी यूपीएससी परीक्षेच्या आधी बीपीएससी परीक्षा पास केली. परंतु त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे सरकारी नोकरी मिळूनदेखील त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.आएएस श्वेता भारती यांनी दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास केला.

श्वेता भारती यांचा जन्म बिहारमधील नालंदा येथे झाला. त्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्या होत्या. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण पाटणा येथून केले. त्यानंतर त्यांनी बीटेकमध्ये पदवी प्राप्त केली. इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना देशातील टॉप कंपन्यांमधील एक म्हणजे विप्रो कंपनीत नोकरी मिळाली. (IAS Shweta Bharti Success Story)

विप्रो कंपनीत त्यांना ४-५ लाख रुपयांचे पॅकेज होते. परंतु श्वेता यांचे स्वप्न वेगळे होते. त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळेच त्यांना विप्रो कंपनीत ९ तास शिफ्ट करुन त्यांनी अभ्यासदेखील केला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी नोकरीसोबतच अभ्यास करायचे ठरवले. श्वेता या दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास करायच्या.

श्वेता यांनी २०२० मध्ये BPSC परीक्षा क्रॅक केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षादेखील क्लिअर केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT