Earthquake : मोठी बातमी! दिल्ली, बिहार अन् बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; 7.1 रिश्टर स्केल तीव्रता

Earthquake in Nepal : सकाळी सकाळी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे तीव्र धक्के भारतातही जाणवले आहेत. बिहार, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
Earthquake
Earthquake Saam Tv (संग्रहित छायाचित्र)
Published On

Earthquake in Nepal : आज (मंगळवारी) सकाळी लोक झोपेत असतानाच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दिल्ली, बिहारसह पश्चिम बंगालमध्ये हादरले जाणवले. सकाळी ६.३५ वाजता नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या लोबुचेपासून 93 किमी उत्तर-पूर्वेला होता. नेपाळमध्ये झालेल्या भूंकपाचे हादरे भारत, बांग्लादेश आणि चीनमध्ये जाणवले आहेत. अद्याप कुठेही कोणतीही हानी किंवा जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सकाळी 6:37 वाजता (7 जानेवारी) भूकंपाचे (Earthquake in West Bengal) धक्के जाणवले. जवळपास ३० सेकंदापर्यंत जमीन हादरत होती. नागरिक झोपेत असताना अचानकच भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भीतीचे वातावरण होते. जलपाईगुडीमध्ये सकाळी 6.35 वाजता आणि त्यानंतर काही वेळातच बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त इतर काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवलेत.दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंपामुळे हादरे बसले आहेत.

बिहारमध्ये 5.1 इतकी तीव्रता

बिहारमध्ये 6 वाजून 40 वाजता भूकंपाचे हादरे जाणवल्याची नोंद झाली आहे. येथील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजण्यात आली. समस्तीपूर, मोतिहारीसह अनेक भागात सकाळी 6.40 वाजता भूकंपाचे हादरे जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते १० सेकंद बिहारमध्ये भूकंपाचे हादरे जाणवत होते. भूकंप इतका जोरदार होता की लोक घाबरून घराबाहेर पळाले. कोणताही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

कोणतीही जिवितहानी नाही

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळ लोबुचेच्या 93 किलोमीटर ईशान्येला सकाळी 6:35 वाजता भूकंप झाला. त्याची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. आतापर्यंत यामुळे कोणत्याही नुकसानीचे अथवा जिवितहानीचे वृत्त नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com