Success Story: शिक्षणासाठी घर सोडले, १६ फ्रॅक्चर अन् ८ सर्जरी; हार न मानता पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक

Success Story Of Ummul Kher: उम्मुल खेर यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी शिक्षणासाठी घर सोडले होते. त्यांच्यावर ८ सर्जरीदेखील झाल्या होत्या.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काही न काही संघर्ष हा करावा लागतोच.आयुष्यात यश मिळवायचे असेल तर परिस्थितीवर मात ही करावीच लागते. कितीही बिकट परिस्थिती असेल तर त्यावर मात कशी करायची हे उम्मुल खेर यांच्याकडून शिकावे. लहानपणीच आईचे छत्र हरपलं, त्यांच्या १६ शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)

Success Story
Success Story: अभ्यासासोबत गुरं चरायली घेऊन जायचा, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS प्रेमसुख डेलू यांचा प्रेरणादायी प्रवास

उम्मुल खेर यांचा जन्म राजस्थानच्या पाली येथे झाला. त्या खूप लहान होत्या तेव्हाच ते दिल्लीला शिफ्ट झाले. दिल्लीत त्यांनी लहानश्या झोपडीत बालपण काढले. त्यांचे वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे. उम्मुल या खूप लहान होत्या तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या आईला त्यांचे शाळेत जाणे आवडायचे नाही. उम्मुल यांना अभ्यासाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी घर सोडून एकटे राहण्याचा निर्णय घेतला. (Success Story of Ummul Kher)

उम्मुल या आठवीत असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिकण्यापासून मनाई केली. परंतु त्यांनी एकटे राहून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका झोपडीत राहून लहान मुलांचे ट्युशन घेतले. यातून त्यांनी आपला खर्च भागवला. त्यांनी बारावीत ९१ टक्के गुण मिळवले होते.

२०१२ मध्ये त्यांच्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग घडला. त्यांचा दुर्दैवी अपधात झाला. त्यानंतर त्यांना जवळपास १ वर्ष व्हील चेअरवरच बसावे लागले. त्यानंतर त्यांनी जेएनयूमध्ये मास्टर इन इंटरनॅशनल स्टडीजसाठी प्रवेश परीक्षा दिली. त्यातून त्यांना पैसे मिळाले. यातूनच त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. (UPSC Success Story)

Success Story
Success Story : स्वप्नासाठी घर विकलं, आईच्या नावाने कंपनी उभारली, आज १००० कोटींचे साम्राज्य

उम्मुल खैर यांना बोन फ्रैजाइल डिसॉर्डर नावाचा आजार होता. यात त्यांच्या शरीरातील हाडे कमजोर होतात. त्यामुळे हाडे तुटतात. त्यांच्या पायात १६ फ्रॅक्चर होते. त्यामुळे त्यांची १६ वेळा सर्जरी करावी लागली.उम्मुल यांनी लहानपणापासूनच आयएएस व्हायचे होते. त्यांनी पीएचडी केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्लिअर केली.

Success Story
Success Story: आईच्या कष्टांची किंमत आणि भावाच्या पाठिंब्याचे फळ, वसीमा बनली उपजिल्हाधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com