Success Story: मिस इंडिया फायनालिस्ट बनली IFS ऑफिसर, केवळ १० महिन्यात UPSC क्रॅक

Success Story Of IFS Aishwarya Sheoran: आयएफएस ऑफिसर ऐश्वर्या श्योरण यांनी फक्त १० महिन्यात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी त्यांनी मॉडेलिंग करिअरला सोडले.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनती करुन कोणताही व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. त्यात यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असंच स्वप्न ऐश्वर्या श्योरण यांनीदेखील पाहिले आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केले. त्यांची इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. त्या सध्या आयएफएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (Success Story)

जर तुम्ही खूप मेहनत केली तर तुम्हाला यश मिळते.ऐश्वर्या श्योरण यांचा जन्म १९९७ रोजी राजस्थान येथे झाला. त्यांचे वडिल अजय श्योरण भारतीय सेनेत अधिकारी होते. त्यांनी आर्मीच्या कुटुंबात जन्मलेल्या असल्याने त्यांना लहानपणापासूनच शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व माहित होते. (Success Story Of IFS Aishwarya Sheoran)

Success Story
Success Story: १४व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी पदरात दोन मुले, जिद्द सोडली नाही, IPS झाल्या, वाचा प्रेरणादायी प्रवास

त्यांनी दिल्लीतील एका शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.ऐश्वर्या श्योरण यांनी अभ्यासासोबत मॉडेलिंदेखील करायच्या. त्यांनी २०१४ मध्ये टाइम्स फ्रेश किताबदेखील जिंकला होता. त्यानंतर त्यांनी फॅशन शोमध्ये सहभाग घेतला.

२०१६ साली त्यांनी फेमिना मिस इंडिया फायनालिस्ट झाल्या. मॉडेलिंगसोबत त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले.

मॉडेलिंगच्या क्षेत्रातून बाहेर येऊन त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांनी सोशल मिडिया आणि इतर सर्व गोष्टींपासून काही दिवस ब्रेक घेतला. त्यांनी कोचिंग क्लासशिवाय परीक्षा दिली.

Success Story
Success Story: 12th फेल, भिकारींसोबत झोपले, शिपाई म्हणून काम केले; चौथ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS मनोज कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

ऐश्वर्या या रोज १०-१२ तास अभ्यास करायच्या. त्यांनी अनेक पुस्तकांमधून अभ्यास केला. ऐश्वर्या यांनी UPSC 1019 च्या परीक्षेत ९३ रँक मिळवली. त्या भारतीय विदेश सेवेत IFS म्हणून रुजू झाल्या. त्यांनी फक्त १० महिन्यात परिक्षेची तयारी केली. ऐश्वर्या यांचा मॉडेलिंग ते IFS ऑफिसर हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. (Miss India To IFS Officer Success Story)

Success Story
Success Story: अभ्यासासोबत गुरं चरायली घेऊन जायचा, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS प्रेमसुख डेलू यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com