Success Story: १०वी, १२वीत टॉपर, इंजिनियरिंगसोबत केला UPSC चा अभ्यास; पहिल्याच प्रयत्नात यश; IAS सृष्टी देशमुख यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Srushti Deshmukh Success Story: लहानपणापासून अभ्यासात हुशार, १२वीत ९३ गुण मिळवले अन् पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली यूपीएससी परीक्षा. IAS सृष्टी देशमुख यांची सक्सेस स्टोरी वाचा.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न सृष्टी देशमुख यांनीदेखील पाहिलं होतं. त्यांनी हे स्वप्न पूर्णदेखील केले. सृष्टी देशमुख या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आयएएससोबत त्या एक लेखिकादेखील आहेत. त्या नेहमी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. (IAS Srushti Jayant Deshmukh)

Success Story
Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची; MBBS केलं, हॉस्पिटलमध्ये नोकरी करत UPSC क्रॅक; IAS नागार्जुन गौडा यांची यशोगाथा

सृष्टी देशमुख यांचा जन्म २८ मार्च १९९६ रोजी भोपाळमध्ये झाला. त्या पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होत्या. शाळेत असताना त्या नेहमी टॉपर होत्या. सृष्टी जयंत देशमुख यांचे वडिल इंजिनियर होते. सृष्टी यांची आई शिक्षिका आहेत.सृष्टी देशमुख यांनी भोपाळच्या कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यांना दहावीत 10 CGPA गुण होते. तर १२वीत ९३ टक्के होते. त्यानंतर त्यांनी इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळवली. याचसोबत त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली. (IAS Srushti Deshmukh Success story)

सृष्टी जयंत देशमुख यांनी २०१८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ५ वी रँक मिळवली. त्या २०१८ च्या बॅचच्या मुलींमध्ये टॉपर होत्या.सृष्टी यांनी यूपीएससी मेन्स परिक्षेत ८९५ गुण मिळवले तर मुलाखतीत १७३ गुण मिळवले. (UPSC Success Story)

Success Story
Success Story: आई-वडिलांचे काबाडकष्ट अन् पोराची मेहनत, कोल्हापूरच्या रोहितची उंच भरारी; 'इस्त्रो'त शास्त्रज्ञ म्हणून निवड

सृष्टी देशमुख या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी बॅचमेच IAS डॉ. नागार्जुन बी गौडा यांच्याशी लग्न केले. त्यांची भेट LBSNAA मध्ये ट्रेनिंगदरम्यान झाली. त्यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली.त्यांचे सोशल मीडियावरदेखील खूप फॉलोवर्स आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक पुस्तके लिहली आहेत.

Success Story
Success Story:३५ वेळा नापास, हरला नाही, जिद्दीच्या जोरावर दोनदा UPSC क्रॅक; IAS विजय वर्धन यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com