Dr. Abhijeet Bichukale : विद्यापीठाचे लाेक मला शाेधत आले, अभिजीत बिचुकलेंना डाॅक्टरेट पदवी बहाल (Video)

Lok Sabha Election 2024 : संविधान वाचवण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे अभिजीत बिचुकलेंनी नमूद केले. नेत्यांना स्वतःची आयडेंटिटी तयार करता येत नाही अशी खंतही व्यक्त केली.
magic book of records awarded honorary doctorate to abhijeet bichukale
magic book of records awarded honorary doctorate to abhijeet bichukalesaam tv

Abhijeet Bichukale Latest Marathi News :

वयाच्या 20 व्या वर्षापासून मी साहित्य, मनाेरंजन, राजकारण, समाजकारण क्षेत्रात कार्यरत आहे. विविध क्षेत्रातील माझे याेगदान लक्षात घेऊन मला नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. आता मी डाॅ. अभिजीत बिचुकले (dr abhijeet bichukale) लिहू शकताे असे अभिजीत बिचुकले यांनी नमूद केले. मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर आनंदित झालेल्या बिचुकले यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना लाेकसभा निवडणुकीवर देखील प्रकाश टाकला. (Maharashtra News)

डॉ. अभिजीत बिचुकले म्हणाले मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड हे नामांकित लोकांचा शोधून घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करतात. मनाेरजंन क्षेत्रातील माझे याेगदान लक्षात घेता त्यांनी माझी निवड केली. महाराष्ट्रातील विशेषत: मराठी मनाेरंजन क्षेत्रातील माझ्या कामगिरीची दखल घेतली गेल्याचे बिचुकलेंनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

magic book of records awarded honorary doctorate to abhijeet bichukale
Election Commission of India चा निर्णय, निवडणुक अधिकारी, कर्मचा-यांना मिळेल Cashless Medical Treatment

लोकसभा निवडणूक लढवणार

लोकसभा निवडणूकी विषयी बाेलताना बिचुकले म्हणाले थोड्याच दिवसात मी लाेकसभेची भूमिका जाहीर करणार आहे. मी निवडणुक लढवणार आहे. माघार घेणार नाही. माझे नाव आहे. बेडूक इकडून तिकडे उड्या मारतात महाराष्ट्रत मी एकदा ठरवले की ठरवले, निवडणूक लढवणारच.

 (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

दरम्यान संविधान वाचवण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे बिचुकलेंनी नमूद केले. नेत्यांना स्वतःची आयडेंटिटी तयार करता येत नाही. त्यामुळे हे सगळे अमित शहांच्या घरचे चाकर झाले आहेत. आज नाव कोणाचं घेत नाही असेही बिचुकलेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

magic book of records awarded honorary doctorate to abhijeet bichukale
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! कोकणात कलिंगड शेतीतून मिळविले लाखाेंचे उत्पन्न; वाचा नाईकांची यशाेगाथा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com