लाेकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदान अधिकारी, कर्मचारी (Polling Personnel) यांना सोईसुविधा व कल्याणकारी उपयायोजना करण्यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ याच्या कामासाठी नियुक्त केलेले मतदान अधिकारी, कर्मचारी (Polling Personnel) यांचा निवडणुकीच्या दरम्यान दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ रोकड विरहित वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. हा निर्णय अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना दिलासादायक ठरणारा आहे. (Maharashtra News)
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यास निमशासकीय अधिकारी, कर्मचारी आदी घटकांना निवडणुकीचे काम दिले जाते. आगामी काळात देशात लाेकसभा निवडणुक हाेणार आहे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर नियाेजन सुरु आहे. दरम्यान निवडणुकीच्या कार्यकाळात छाेट्या दुर्घटना घडतात. त्यात अधिकारी, कर्मचारी यांना आराेग्य विषयक तक्रारी उदभवतात. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
दरम्यान भारत निवडणूक आयोगाने या सूचनांचे तंतोतंत पालन करुन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता नियुक्त केलेले मतदान अधिकारी/कर्मचारी (Polling Personnel) यांच्याकरीता रोकड विरहित वैद्यकीय उपचार (Cashless Treatment) सुविधा पुरविण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.