Lok Sabha Election 2024 : पैलवान ते छत्रपतींची गादी! सातारा लोकसभा मतदारसंघ यंदा कोण गाजवणार?

Lok Sabha Satara Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो. सातारा लोकसभेत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. कोणते? तर वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam TV
Published On

प्रसाद जगताप, साम टीव्ही

Lok Sabha Election :

सातारा लोकसभा मतदारसंघ! पश्चिम महाराष्ट्रात मोडणाऱ्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. सातारा स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला गेलेला सातारा लोकसभेत काय म्हणून ओळखला जातो? ज्या साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी लोकसभेचा गड जिंकला त्यांचाच मागच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला. हे कसं घडलं? आणि आता 2024 ला काय घडेल? आता साताऱ्याचा इतिहास नेमका काय आहे? तिथलं राजकीय वजन नेमकं कुणाचं जास्तंय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

Lok Sabha Election 2024
LokSabha Election 2024 : राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत काय चर्चा झाली? दोन महत्त्वाच्या गोष्टी आल्या समोर

सातारा लोकसभेचा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

वाई

कोरेगाव

कराड उत्तर

कराड दक्षिण

पाटण

सातारा

सातारा लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो. सातारा लोकसभेत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. कोणते? तर वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा.

आता 2014 मध्ये सातारा लोकसभेत कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण किती मतांनी जिंकलं ते पाहुयात.

2014 साली उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवली. ज्यात तब्बल 3 लाख 66 हजार 364 हजार मतांच्या फरकाने उदयनराजे विजयी झाले.

2019 सालीही उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. यावेळी त्यांची नरेंद्र अण्णासाहेब पाटालंबरोबर लढत होती. या निवडणुकीतही उदयनराजे भोसले यांनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी अन्नासाहेब पाटलांचा पराभव केला.

पण, 2019 ला जरी उदयनराजे निवडून आले असेल, तरी नंतर राजकारण बदललं. राजेंनी राष्ट्रवादी सोडण्याआधी खासदारकी सोडली त्यानंतर राष्ट्रवादीही सोडली. मग त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळे साताऱ्यात पोडनिवडणूक झाली.

या पोटनिवडणुकीच्या प्रचारात मैदान गाजवलं, ते शरद पवारांनी. पवारांची पावसातली सभा त्याला मिळालेला भावनिक प्रतिसाद यामुळे राजेंना बसलेला धक्का हे चित्र महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या इतिहासात कायम लक्षात राहण्यासारखं आहे.

शरद पवारांचे अत्यंत जवळचे मित्र श्रीनिवास पाटील निवडणुकीला उभे राहिले. त्यांनी पोटनिवडणुकीत चांगलीच कमाल केली.

2019ची पोटनिवडणूक

सलग दोनवेळा निवडून आलेले राजे 2019च्या पोटनिवडणुकीत पराभूत झाले. उदयनराजे 87 हजार 717 मतांनी पराभूत झाले. म्हणजे सातारा लोकसभेच्या जागेवर सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. सलग दोनवेळा राष्ट्रवादीचं साताऱ्यात लोकसभा जिंकली. आता 2019 आणि 2014 मधली पक्षांना मिळालेल्या लोकसभेतील मतांची आकडेवारी काय सांगते हे पाहणंही महत्वाचं आहे.

कुणाला किती टक्के मतदान?

2014 ला राष्ट्रवादीला 53.5 टक्के मतं पडली. तर युतीने आपला उमेदवारच दिला नाही. 2019 मध्ये पाहिलं तर राष्ट्रवादीला 51.9 इतकी मतं मिळाली. तर शिवसेनेला 40.6 टक्के इतकी मतं मिळाल्याचं दिसलं. म्हणजेच आत्तापर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सातारकरांचा कल असल्याचं दिसतं. पोटनिवडणुकीतही हेच चित्र दिसतं का? पोटनिवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळालं. उदयनराजे भोसलेंनी ही पोटनिवडणूक भाजपकडून लढवली. ज्यात त्यांचा पराभव झाला.

म्हणजे पोटनिडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात बाजी मारली. आता साताऱ्यात कोणत्या पक्षाकडे लोकसभेत मतांचा कौल जातोय, हे पाहिलं पण 2014 आणि 2019 मध्ये तिथे राजकीय ताकद कुणाची कशी होती ते जाणून घेऊ.

सातारा लोकसभेत एकून 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2014 आणि 2019 ला कोणत्या पक्षाची किती ताकद होती, ते पाहुयात.

कुणाची किती ताकद?

2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचं ज्या सातारा लोकसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होतं तेच 2019 ला दिसत नाही. 2014 ला 6 पैकी ३ विधानसभा मतदारसंघ राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 मध्ये केवळ 2 मतदासंघांवर आपला ताबा ठेवता आला आणि 4 मतदासंघ गमवावे लागले.

पण, हे चित्र 2014 आणि 2019 ची विधानसभा निवडणूक होण्याआधीचं आहे. पण आता 2024 मध्ये याहीपेक्षा वेगळं चित्र आहे. कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहीले आहेत. याचे पडसाद सातारा लोकसभा मतदारसंघातही पहायला मिळालेत ते कसे? आणि नेमकं कोण कोणत्या गटात आहे? कुणी बंडखोरी केलीय? हे जाणून घेऊ.

2024 मध्ये कुणाची किती ताकद?

राष्ट्रवादी अजित पवार- 1

राष्ट्रावदी शरद पवार- 1

शिवसेना शिंदे- 2

शिवसेना ठाकरे - 0

काँग्रेस - 1

भाजप - 1

2019 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातूनम भाजपचे शिवेंद्रसिंहराजे विजयी झालेत. कोरेगावचे महेश शिंदे आणि पाटणचे शंभूराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर गेले. वाईच्या मकरंद पाटलांनी राष्ट्रवादीतून अजित पवारांना पाठिंबा दिला. कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच राहीले.

त्यामुळे आता भाजपचे 1, शिवसेना शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रत्येकी 1-1 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण 6 आमदार विभागले गेले आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटण्याआधी चित्र वेगळं होतं.

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटण्याआधी दोघांकडे प्रत्येकी 2-2 आमदार होते, काँग्रेसकडे 1 आमदार होता, आणि भाजपकडे केवळ एक आमदार होता. म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात 6 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांवर मविआचा ताबा होता आणि केवळ 1 मतदारसंघ भाजपला राखता आला होता. पण आता चित्र बदललंय. आता महायुती सरकारजवळ एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. अर्थात पक्षफुटीमुळे विधानसभा मतदारसंघांचीही विभागणी झालीये, ज्यात महायुतीचं पारडं जड दिसतंय.

आता काही प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचंय. ते प्रश्न आणि त्यांची उत्तर पाहुयात.

1. उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का?

2014 - नाही, उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते.

2019 - नाही, कारण इकडेही विजयी उमेदवार हे उदयनराजे भोसलेच होते.

2019 (पोटनिवडणूक) - हो

2. दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा?

2019 - हो पण नाही पण. कारण 2019 ला उदयनराजे भोसले हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले, पण त्यांनी राजीनामा दिल्यावर पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील हे मात्र पहिल्यांदाच निवडून आले होते.

3. युती किंवा आघाडीचा उमेदवाराला फायदा की तोटा?

युतीला तोटा

पण 2019 च्या पोटनिवडणुकीपर्यंत आघाडीसाठी हा मतदारसंघ फायद्याचा होता. 2014 साली या मतदारसंघात युतीने आपला उमेदवार दिला नव्हता. 2019 साली उमेदवार दिला पण तो पराभूत झाला होता आणि पोटनिवडणुकीतही भाजपकडून लढणारे उदयनराजे भोसले पराभूत झाले होते. अर्थात आत्तापर्यंत तरी या लोकसभा मतदरसंघाचा फायदा आघाडीला झाल्याचं दिसतंय.

4. पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसंय?

पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय. राष्ट्रवादी एकहाती सत्ता असणाहा हा लोकसभा मतदारसंघ आता पूर्णपणे विखुरला गेलाय. त्यातल्या त्यात मराठा फॅक्टर आणि छत्रपतींची गादी असणारे उदयनराजे भोसले हे भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे पक्षनिहाय आकडेवारीत जरी या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पहायला मिळत असला, तरी ते 2024 नंतर टिकून राहील का? याबाबत शंका आहे.

कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. पण दोन्ही उमेदवारांमध्ये 87 हजार 717 मतांचा फरक होता. जो फार मोठा नाही. त्यामूळे उदयनराजे नेमकं कुणाच्या बाजूने लढतात? मराठा मतदारांचा कल कुणाच्या बाजूने जातो? वंचितची भूमिका या मतदारसंघात काय असते? आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? यावरुन सातारा लोकसभा मतदारसंघाचं गणित स्पष्ट होईल.

Lok Sabha Election 2024
Pune Politics News: पुण्यात भाजपला मोठा धक्का, गिरीष बापट यांचे निकटवर्तीय शरद पवारांच्या गळाला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com