Success Story: आई-वडिलांचे काबाडकष्ट अन् पोराची मेहनत, कोल्हापूरच्या रोहितची उंच भरारी; 'इस्त्रो'त शास्त्रज्ञ म्हणून निवड

Success Story Of Scientist Rohit Patil: मेहनतीच्या जोरावर कोणीही यश मिळवू शकतो. असंच काहीसं कोल्हापूरच्या रोहित पाटीलसोब झालंय. कोल्हापूरचा रोहित पाटील हा इस्त्रोत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाला आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

भारत देश हा खूप प्रगत देश आहे. सर्वाधिक तरुणाई असलेल्या देशात अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भारताने सैन्यापासून ते अंतराळापर्यंत सर्व ठिकाणी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारताने मंगळावरही आपला झेंडा रोवला आहे. याचं श्रेय आपल्या शास्त्रज्ञांना जाते. शास्त्रज्ञ होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असंच स्वप्न कोल्हापुरच्या रोहित लक्ष्मण पाटील याने पाहिलं होतं. त्याने ते स्वप्न पूर्णदेखील केलं. (Success Story)

Success Story
Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची; MBBS केलं, हॉस्पिटलमध्ये नोकरी करत UPSC क्रॅक; IAS नागार्जुन गौडा यांची यशोगाथा

कोल्हापूरच्या मालवे येथील राहणाऱ्या रोहित पाटील याने यशाला गवसणी घातली आहे. त्याच्या घरची परिस्थिती बिकट होती. परंतु मनात जिद्द होती. त्याने मेहनतीच्या जोरावर सर्व अडचणींवर मात केली. रोहितच्या आईवडिलांनी खूप कष्ट करुन त्यांना शिकवलं. त्यांने मोठा अधिकारी व्हावा, असं त्याच्या आईवडिलांना वाटत होतं. रोहितनेदेखील खूप जिद्दीने अभ्यास केला. रोहितने गारगोटीच्या आयसीआरई कॉलेजमधून मेकॅनिकलमधून इंजिनियरिंग डिप्लोमा केला. (Success Story Of Rohit Patil)

रोहितने शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून डिग्री पूर्ण केली. त्यानंतर त्याची ऑइल आणि नॅचरल गॅस या कंपनीत असिस्टंट इंजिनियर म्हणून निवड झाली. त्यानंतर त्याने इस्त्रोची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले परंतु त्याने पुन्हा प्रयत्न केले. त्याची इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली.

Success Story
Success Story: १३ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलं; लंडनमधील ऑफर नाकारली; चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; प्रेरणा सिंह यांची यशोगाथा वाचा

शेतकरी कुटुंबातील रोहितनं परिस्थिती बेताची असताना, एकदा अपयश आलं असताना कष्ट करत थेट शास्त्रज्ञ पदाला गवसणी घातल्याने त्याच्यावर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान अंतकरणात सत्य, अतोनात कष्ट करण्याची तयारी आणि देवावर नितांत श्रद्धा असल्यास यश निश्चित मिळतं अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिलीयं.

Success Story
Success Story: वडील रिक्षा ड्रायव्हर; आर्थिक परिस्थिती बिकट, २१ व्या वर्षी क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com