Success Story: वडील रिक्षा ड्रायव्हर; आर्थिक परिस्थिती बिकट, २१ व्या वर्षी क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Ansar Shaikh: देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी अन्सार शेख यांनी पहिल्याच प्रयत्नानत यूपीएससी क्रॅक केली. त्यांनी खूप खडतर परिस्थितीत परीक्षा दिली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दिवस-रात्र मेहनत करुन अभ्यास करावा लागतो. परंतु अनेकदा यूपीएससी परीक्षा देताना अपयश येते. पहिल्याच प्रयत्नात खूप कमी लोक ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करतात. खूप कमी वयात पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक करणाऱ्यांमध्ये अन्सार शेख यांना क्रमांक पहिला आहे. (Success Story)

Success Story
Success Story: ठाण्याच्या लेकीची यशोगाथा! इंजिनियरिंग सोडली, २ वेळा UPSC क्रॅक; आधी IPS, आता IAS, वाचा

अन्सार शेख यांनी वयाच्या २१ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.२०१६ मध्ये ३६१ वी रँक मिळवत त्यांनी नवीन विक्रम केला आहे.

यूपीएससी परीक्षा देताना खूप अडथळे येतात. परंतु कितीही काही झाले तरीही जो व्यक्ती प्रयत्न थांबवत नाही तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. असंच यश जालन्याच्या अन्सार शेख यांना मिळालं आहे. अन्सार शेख यांचे वडिल रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आई शेती करते. खूप गरीब कुटुंबातून आलेल्या अन्सार शेख यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. (Inspirational Story Of Ansar Shaikh)

आर्थिक परिस्थिती बिकट

अन्सार यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. ते लहानपणापासूनच हुशार होते. त्यांनी दहावी ९१ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. (IAS Ansar Shaik Success Story)

Success Story
Success Story: २० व्या वर्षी पतीचं निधन, SBI मध्ये झाडू मारला; टॉयलेट साफ केलं, त्याच बँकेत झाल्या अधिकारी

जालन्याच्या अन्सार शेख यांची कमाल (IAS AnSar Shaikh)

मराठवाड्यातील जालनाचे रहिवासी अन्सार शेख यांनी मेन्स परीक्षा आणि इंटरव्ह्यू मराठीत देण्याचा निर्णय घेतला. अन्सार यांना लहानपणी खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. कुटुंबियांची मदत करण्यासाठी अन्सार यांच्या वडिलांना लहान असतानाच शिक्षण सोडले आणि गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.अन्सार यांच्या बहिणीचे लग्न १५ व्या वर्षी झाले. परंतु त्यांनी आपल्या स्वप्नांच्या मागे धावणे कधीच सोडले नाही. त्यांनी २०१६ मध्ये यूपीएससी क्रॅक केली. ते सर्वात तरुण आयएएस अधिकारी होते.

Success Story
Success Story: डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, पण आशा सोडली नाही; 4 महिन्यात UPSC क्रॅक, IAS तरुणी पांडेंची यशोगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com